शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यात ४७ गावांसाठीची राष्ट्रीय पेयजल योजना ५ वर्षांपासून कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:11 IST

पाच वर्षे उलटली तरीही या योजना पूर्ण न झाल्याने बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़

- गोविंद शिंदेकंधार (नांदेड ) : तालुक्यातील ४७ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या़ गावाच्या लोकसंख्येनुसार मंजुरी देऊन पाच वर्षे उलटली तरीही या योजना पूर्ण न झाल्याने बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात आला़ या योजनेअंतर्गत कंधार तालुक्यातील ४७ गावांसाठी २०१३ मध्ये योजना मंजूर करण्यात आल्या़ मात्र पाच वर्षे उलटली तरीही यातील बहुतांश कामे कागदावरच असल्याचे दिसते़ या कार्यक्रमांतर्गत काटकळंबासाठी ४६ लाख १७ हजार, मंगनाळी व वाडी २२ लाख, मसलगा ३१ लाख ४३ हजार, शिरूर २९ लाख ८२ हजार, राहटी १९ लाख ३७ हजार, नंदनवन ४५ लाख २२ हजार, आलेगाव ५३ लाख ६६ हजार, बाचोटी ५२ लाख २१ हजार, बामणी ४० लाख ८१ हजार, सावळेश्वर २९ लाख ४६ हजार, भंडारकुमठ्याची वाडी १८ लाख ९८ हजार, गोणार २४ लाख ९८ हजार, खंडगाव २६ लाख ९२ हजार, मादाळी १२ लाख ३ हजार यासह तालुक्यातील ४७ गावांत ९ कोटी ४४ लाख ४ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता़

निधी वितरित केल्यानंतर संबंधित गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल, अशी अपेक्षा होती़ मात्र पाच वर्षे उलटली तरी बहुतांश योजना अर्धवट असल्याने पाणीटंचाई कायम आहे़ सद्य:स्थितीत कंधार तालुक्यातील अनेक गावांत टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली असून टँकरसाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविले जात आहेत़ योजनेतून पाणीपुरवठा योजनेची कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली असती तर या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला नसता़ दरम्यान, मराठा महासंग्राम संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन दिले आहे़ 

... म्हणे ग्रामसेवकाने कागदपत्रेच दिली नाहीतराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत सावळेश्वरचे ग्रामसेवक के़एम़ हाम्पले यांना विचारले असता, योजना अपूर्ण असल्याचे सांगत मागील ग्रामसेवकाने योजनेबाबतची कागदपत्रे पदभारावेळी दिली नसल्याची तक्रार केली़ तर काटकळंबाचे ग्रामविकास अधिकारी एस़ के़ खंडारे यांनी या योजनेसाठी जेवढा निधी मिळाला तेवढा खर्ची झाल्याचे सांगत निधीअभावी कामे अपूर्ण असल्याची कबुली दिली़

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकारNanded zpनांदेड जिल्हा परिषद