शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या कृष्णूर धान्य घोटाळ्यातील वाहतूक ठेकेदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:23 IST

: कृष्णूर धान्य घोटाळ्यातील वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांचा जामीन अर्ज बिलोलीचे सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांनी फेटाळून लावला़

बिलोली (जि़नांदेड) : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांचा जामीन अर्ज बिलोलीचे सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांनी फेटाळून लावला़ बचाव पक्षाने पुरवठा विभाग तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाचा पुरावा देत बाजू मांडली़ मात्र ती निष्फळ ठरल्याने पोलीस जिंकले, प्रशासन हरले अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.

धान्य घोटाळ्यात मेगा फूड अनाज कंपनीच्या व्यवस्थापकाचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आला़ १८ जुलै रोजी पोलिसांनी १० ट्रक पकडले होते़ ज्यातील तीन ट्रक नायगाव, कुंडलवाडी, मुक्रमाबाद येथे जात होते़ संबंधित ठिकाणी धान्य व्यवस्थित पोहोचविण्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याचे वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांची होती़ मात्र ही जबाबदारी त्यांनी योग्यरित्या पाळली नाही़ १० पैकी ७ ट्रक हिंगोली जिल्ह्यातील ठेकेदाराचे निघाले़तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी याकामी पुढाकार घेवूनसंबंधिताविरूद्ध गुन्हे नोंदविले़ राजू पारसेवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला.

सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद मागील चार दिवसांपासून सुरू होता़ बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला़ त्याचप्रमाणे तिन्ही ट्रकमधील पकडलेले धान्य संबंधित गोदामाच्या शासकीय रजिस्टरवर असल्याचा पुरावा दिला़ दुसरीकडे पारसेवार यांचे सर्व रेकॉर्ड जप्त करण्यात आले़ शासनाशी त्यांचा लेखी करार आहे़ भविष्यातील दररोजची वितरण व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मिळावा असे बचाव पक्षाचे अ‍ॅड़व्ही़एस़ देशमुख यांनी न्यायालयात सांगितले़ सरकार पक्षाकडून पोलिसांनी केलेली कारवाई, महिनाभरात केलेला तपास या संबंधीचे पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले़ न्या़एस़बीक़चरे यांनी तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना देखील पोलिसांची बाजू मांडण्याची संधी दिली़ जवळपास २० मिनिटे हसन यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले़ या घोटाळ्यात अनेकांचा सहभाग असल्याचे सांगून जामिनाला विरोध केला़ या युक्तिवादानंतर कचरे यांनी पारसेवार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला़ सरकारची बाजू अ‍ॅड़ दिलीप बोमनाळीकर यांनी मांडली़

पारसेवारच मुख्य सूत्रधारधान्य घोटाळ्यात राजू पारसेवारच मुख्य सूत्रधार असल्याचा अहवाल पोलिसांनी कोर्टात दिला़ नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील २२ शासकीय गोदामात धान्य पोहोचविण्याचा ठेका पारसेवार अँड कंपनीकडे आहे़ शासन करारानुसार धान्य वेळेत व योग्य ठिकाणी वाहतुकीची जबाबदारी पारसेवार यांचीच आहे़ १८ जुलैच्या पहिल्या आठवड्यात हदगाव, किनवट, माहूर भागात जाण्याचे ट्रक नायगाव मार्गावर टोलनाक्यावर आढळले़ अशा २६ शासकीय धान्य ट्रकची विल्हेवाट मेगा फूड कंपनीतच झाली़ परिणामी पुरवठा विभाग व कंत्राटदाराच्या संगनमताने घोटाळा झाला़ पारसेवार हेच  मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले़ 

पोत्यात भूसा भरुन उचलले कर्जकृष्णूर धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे़ पोलिसांनी योग्य रितीने तपास केला़ पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत़ जे न्यायालयात सादर करण्यात आले़ मेगा फूड अनाज कंपनीने धान्य दर्शवून पोत्यात भुसा भरला व बँकेचे कर्ज उचलले़ याबाबतही पुरवठा विभागाच्या वतीने मोजणी सुरू आहे़ कर्ज दिलेल्या बँकांना देखील यासंबंधी कळविण्यात आले़ बँकेला फसवल्याचा गुन्हा कंपनीवर दाखल होवू शकतो -नुरुल हसन, तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक़

टॅग्स :Courtन्यायालयNandedनांदेडPoliceपोलिसfraudधोकेबाजी