शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:06 IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला.

नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला. या उत्साही वातावरणात सहभागी घेवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाल्याचा आनंद नांदेडकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.नांदेड शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) येथे राज्यस्तरीय योग दिनासाठी मागील दहा दिवसापासून राज्य शासनाच्या विविध आस्थापना आणि पतजंली योगपीठाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शुक्रवारी भल्या पहाटेपासूनच शिबिराकडे जाणारे रस्ते वाहनांच्या व नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला युवक-युवती , महिला -पुरुष, अबाल वृध्द , शिक्षकवर्ग , विद्यार्थी असे शहरी, ग्रामीण भागातील लाखो नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमस्थळी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या योग प्रात्यिक्षिकांना एका भव्यदिव्य सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पांढºया शुभ्र पोषाखामधील लाखों नागरिक योगासनाचे विविध प्रकार करीत होते. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे सलग पाचवे वर्ष असल्याने राज्यस्तरीय शिबिराचा बहुमान नांदेड नगरीला प्राप्त झाल्याने हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवून आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती उत्साही दिसत होता.यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई चिखलीकर-देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आदींसह हजारो योग साधकांची या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.नांदेडच्या विद्यार्थ्यांकडून म्युझीकल योगानांदेड : नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय योग शिबीरामध्ये योगगुरू रामदेव बाबा यांच्या समक्ष मुख्य मंचावर नांदेडच्या विद्यार्थ्यांनी म्युझिकल योगा सादर केला़ लक्ष्य चित्रपटातील कंदे से कंदे मिलते है़़़ या गाण्यावर विविध प्रकारची योगासने करून नांदेडकरांचे लक्ष वेधले़आंतरराष्ट्रीय स्तरावर योगा स्पर्धेत भारताला विविध पदके मिळवून देणाºया श्रेयस मार्कंण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी काडगे, राही डोईफोडे, बागेश्री जोशी, सौख्य झंवर, श्रीशा मारकोळे, कृष्णा विजय भोसले, लौकिक कदम, संदेश भवर, सुमेध सूर्यवंशी, विनायक पालेकर, प्रचिती येलमगुंडे या विद्यार्थ्यांनी सदर नृत्यामध्ये सहभाग नोंदविला़ सादरीकरणानंतर योगगुरू रामदेव बाबा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे रूद्राक्षाची माळ घालून कौतूक केले़बसेसची व्यवस्थानांदेड शहरातील प्रत्येक भागासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था केली होती़ तर शाळकरी मुलांना त्या त्या शाळांच्या बसेसमधून योग शिबीरस्थळी येण्या - जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ त्याचबरोबर शिबीरात सहभागीसाठी पाण्याची छोटी बॉटल आणि बिस्किट पुरविण्यात आले़

नांदेडमध्ये शुक्रवारी पार पडलेले योग शिबीर आनंददायी ठरले. आम्ही योगदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह सहभागी झालो आहोत. योगगुरु रामदेवबाबांना प्रत्यक्षात योगासने करुन दाखवताना पाहता आले. याचा आनंदा आहे.-रिझवाना अंजुम, उर्दू प्राथमिक शाळा नागार्जुननगर.व्यायाम आणि योगासने आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून त्यामुळे आपणाला शारिरीक दुखण्यांपासून दूर राहण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची संधी मिळते. -डॉ. राहुल मैड, फिजिओथेरेपी कॉलेजहा उपक्रम योगदिनाच्या माध्यमातून जगभरात नेवून याला मोठी मान्यता दिली़ भंडारा जिल्ह्यातून योग साधकांचे व प्रचारकांचे पथक पंधरा दिवसांपासून नांदेड येथे होते.-प्रिती डोंगरवार, भंडारा

टॅग्स :NandedनांदेडYogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBaba Ramdevरामदेव बाबा