शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नांदेडात ‘गोविंदा-गोविंदा’च्या गजरात सिमोल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:42 IST

‘गोविंदा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा’ च्या गजरात लाखो भाविकांनी गुरुवारी भगवान बालाजीचे दर्शन घेतले. सायंकाळी निघालेल्या भगवान बालाजीच्या रथयात्रेतही भाविकांनी सहभागी होण्यासाठी गर्दी केली.

ठळक मुद्देसंघाचे शहरात पथसंचलनधम्मचक्र प्रवर्तन दिनही उत्साहात साजरागाडीपुरा भागात रावणदहनास हजारो भाविक उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘गोविंदा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा’ च्या गजरात लाखो भाविकांनी गुरुवारी भगवान बालाजीचे दर्शन घेतले. सायंकाळी निघालेल्या भगवान बालाजीच्या रथयात्रेतही भाविकांनी सहभागी होण्यासाठी गर्दी केली.शहरातील बालाजी मंदिरात गुरुवारी पहाटेपासूनच दसऱ्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. प्रतिकात्मक सोने एकामेकांना देवून शुभेच्छाही दिल्या. दस-यानिमित्त सणानिमित्त शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बालाजी मंदिरामध्ये दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘गोविंदा गोविंदा गोविंदा’ या घोषणेने बालाजी मंदिर परिसर दणाणून गेला होता. दसरा महोत्सवानिमित्त बालाजी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात अलाी होती. श्री बालाजीचे दर्शन घेण्यासाठी शहरासह परिसरातील भाविक नांदेडात दाखल झाले होते.सायंकाळी सहाच्या सुमारास रथयात्रेला प्रारंभ झाला. लाखो भाविकांनी या रथयात्रेत सहभाग नोंदविला. ‘गोविंदा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा’ च्या गजराने परिसर दुमदुमला होता. श्री बालाजी मंदिरापासून जुन्या मोंढ्यापर्यत आणि दुसºया बाजूने गुरुद्वारा चौकापर्यत पाय ठेवायलाही जागा नव्हती. लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होते.शहरातील जुन्या नांदेडात गाडीपुरा येथे रावणदहन करण्यात येतो. गाडीपुरा येथील हनुमान मंदिरातही दर्शनासाठी हजारो भाविक जमले होते. गाडीपुरा येथे गेल्या अनेक वर्षापासून रावणदहनाचा कार्यक्रम होतो. रात्री दहाच्या सुमारास रावणदहन करण्यात आला.दरम्यान, गुरुवारी संघ परिवाराच्या वतीने सकाळी शहरातील मल्टी पर्पज हायस्कूल येथून पथसंचलनाला प्रारंभ करण्यात आला. चिखलवाडी, बडपुरा, भगतसिंग चौक, लालवाणी पेट्रोलपंप मार्गे बर्की चौक आणि परतीच्या मार्गाने हबीब टॉकीज, रेणूकामाता मंदिर, जुना मोंढा, गुरुद्वारा चौक मार्गे परत मल्टीपर्पज हायस्कूल येथे या पथसंचालनाचा समारोप करण्यात आला. यावेळी संघाचे डॉ. सुधीर कोकरे, डॉ. गोपाल राठी, विक्रम खतगाये, हेमंत इंगळे, अमोल अंबेकर, बापू किनगावकर, मंगेश नवकांडे, व्यंकटेश शिनगारपुतळे यांच्यासह भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख, संजय कौडगे, प्रवीण साले, शीतल खांडील, विरोधी पक्ष नेत्या गुरुप्रितकौर सोडी, भाजपा युवा मोर्चाचे दिलीपसिंघ सोडी, मोहनसिंह तौर आदींची उपस्थिती होती.संघाच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन केले. दरम्यान, शहरातील अनेक भागात दस-यानिमित्त प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. हनुमानगड येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकमेकांना आपट्याची पाने देवून शुभेच्छा दिल्या.

 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन

  • धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आल्या. शहरातील भीमघाट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात आला. गुरुवारी सकाळी ८ वाजता नांदेड दक्षिण शहरचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. तर उत्तर नांदेडचे शहराध्यक्ष पी. आर. धुळे यांनी २२ प्रतिज्ञा दिल्या.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झालेल्या मुख्य अभिवादन सभेला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष डॉ. वि. वा. एंगडे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे यांनी पुष्पांजली अर्पण केली.संस्कार सचिव बी.एन. कांबळे यांनी उपस्थितांना २२ प्रतिज्ञा दिल्या. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदनाही देण्यात आली.
  • रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण केले. भैय्यासाहेब आंबेडकरनगर येथील त्रिपीटक बुद्ध विहारात मोहनराव गोडबोले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. किसा गौतमी महिला मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमास चंद्रकांत गोडबोले, दीपक सातोरे, चंद्रमुनी पडघणे, सुनील गोडबोले, अशोक खाडे, मनोहर राजभोज, कुंडलीकराव कांबळे, महानंदाबाई पंडित, सुमनबाई पाटील, शांताबाई निखाते, सुनील ढगे आदींची उपस्थिती होती.
  • धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने जिल्ह्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणच्या विहारामध्ये पंचशील ध्वजारोहणसह त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली.
टॅग्स :NandedनांदेडDasaraदसरा