शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नांदेडवासियांचा घसा कोरडा, नगरसेवकांना सिक्कीमचे डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:53 IST

पिण्याच्या पाण्यासंदर्भातील शहरावासीयांची चिंता वाढत असताना नगरसेवक मात्र सिक्कीम येथे होणाºया प्रशिक्षण दौ-यावर उताविळ झाले आहेत. उलट महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक हे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन सिक्कीम मधील गंगटोक येथे होणा-या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या तयारीला लागले आहेत.

ठळक मुद्देप्रकल्पातून अवैध उपसा दौऱ्याची तयारीही जोरात

नांदेड :विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला मोठ्या प्रमाणातील अवैध उपसा नांदेड शहरवासीयांचा घसा कोरडा करणारा ठरणार आहे. पिण्याच्या पाण्यासंदर्भातील शहरावासीयांची चिंता वाढत असताना नगरसेवक मात्र सिक्कीम येथे होणाºया प्रशिक्षण दौ-यावर उताविळ झाले आहेत. उलट महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक हे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन सिक्कीम मधील गंगटोक येथे होणा-या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या तयारीला लागले आहेत.आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला या प्रशिक्षणाच्या खर्चातून वाचविण्याची मागणी सामान्य नागरिकातून होत आहे. कर्जबाजारी असलेल्या महापालिकेला मागील चार वर्षाचे ठेकेदारांचे देयके अदा करता आले नाही. कोणतेही नवीन विकास कामेही महापालिकेने गेल्या काही दिवसात सुरू केली नाही.नगरसेवकांची स्वच्छा निधीची मागणीही आता कुठे पूर्ण होत आहे. अद्याप ही कामे निविदा प्रक्रियेतच आहेत. आर्थिक संकटामुळे ही सर्व विकास कामे रखडली आहेत. असे असताना प्रशिक्षणासाठी लाखोंची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्नही पुढे आला आहे. नगरसेवकांच्या प्रशिक्षण दौºयाला नागरिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेता महापालिकेचे नगरसेवक बापुराव गजभारे सदर प्रशिक्षण खर्चासाठी आपले दोन महिन्याचे मानधन देण्याची तयारी दर्शविली आहे. इतर नगरसेवकांनी मात्र अद्याप या विषयावर आपले मत मांडले नाही. नवीन नगरसेवकांना हे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे गजभारे यांनी म्हटले आहे. त्याचवेळी स्वत:चे मानधन प्रशिक्षणासाठी खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. इतर नगरसेवक गजभारे यांच्यासारखी भूमिका घेतील काय? हा प्रश्न आता पुढे आला आहे. पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर महापालिका पदाधिकारी अथवा नगरसेवकांनीही कोणतीही भूमिका घेतली नाही.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाWaterपाणी