शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नांदेडमध्ये तीन वर्षापासून पाणी कराचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:30 IST

पाणीपट्टीच्या देयकामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मागील तीन वर्षात पाणीपट्टीच्या अनेक तक्रारी पुढे आल्या. या तक्रारीची सोडवणूक करण्याऐवजी त्या प्रलंबितच ठेवण्यात महापालिकेने धन्यता मानली. परिणामी २०१५ पासून महापालिकेचा पाणी कर थकीतच राहिला असून नोंव्हेंबर १७ नंतर सुरू केलेल्या पाणीपट्टी वसुलीत ९ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणी : २४ पैकी ९ कोटींची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पाणीपट्टीच्या देयकामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मागील तीन वर्षात पाणीपट्टीच्या अनेक तक्रारी पुढे आल्या. या तक्रारीची सोडवणूक करण्याऐवजी त्या प्रलंबितच ठेवण्यात महापालिकेने धन्यता मानली. परिणामी २०१५ पासून महापालिकेचा पाणी कर थकीतच राहिला असून नोंव्हेंबर १७ नंतर सुरू केलेल्या पाणीपट्टी वसुलीत ९ कोटी रुपये वसूल झाले आहेत.महापालिका हद्दीत आजघडीला ५५ हजार ४५३ नळधारक आहेत. शहरातल मालमत्तांची एकूण संख्या पाहता ती संख्या निम्म्यावरच आहेत. महापालिका हद्दीत आजघडीला १ लाखाहून अधिक मालमत्ताधारक आहेत. शहरात २०१५ नंतर पाणीकराचे देयक वितरीतच झाले नाहीत. पाणी पुरवठ्याचे देयके काढताना तांत्रिक अडचणीमुळे ३१ मार्च ऐवजी १ एप्रिल ही थकबाकीची तारीख निश्चित करण्यात आली. परिणामी ३१ मार्च पूर्वी देयक भरले असतानाही १ एप्रिलच्या तारखेत थकीत रक्कम दर्शवित असल्याचे अनेक प्रकार पुढे आले. तांत्रिक अडचणीमुळे ही बाब घडली असल्याचा खुलासा त्यावेळी करण्यात आला. तक्रारींची संख्या वाढत असताना हा विषयच महापालिकेने बाजुला ठेवला.नोव्हेंबर १७ पासून ९ कोटी रुपये पाणीपट्टीची वसुली करण्यात आली. ३१ मार्चच्या शेवटच्या दिवशी तर तब्बल ५० लाख रुपये पाणीपट्टी पोटी एकाच दिवशी वसूल केले आहेत. महापालिकेची पाणी पट्टीची एकूण मागणीही २४ कोटी रुपयांची आहे. देयक काढताना संगणकीय प्रणालीतील तांत्रिक कारणामुळे पाणीपट्टी कराचा डोंगर महापालिकेपुढे उभा आहे.तो तांत्रिक बिघाड आता दूर करुन पाणीपट्टी कराची मागणी अंतिम करताना वसुलीचा वेगही वाढवला आहे. कार्यकारी अभियंता परवेज कलीम यांच्याकडे पाणीपट्टी कराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ३१ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही वसुली केली जात आहे.त्यातच तत्कालीन आयुक्तांनी मालमत्ता करापासून पाणीपुरवठा कर वसुली विभाग एकत्र करण्याचा निर्णय घेतला. परिणामी मालमत्ताधारकांनी आपल्याकडील केवळ मालमत्ता करच भरला. पाणीकर बाजूलाच राहिला. हा विषय तब्बल तीन वर्षे बाजुलाच राहिला आहे. समीर उन्हाळे यांच्यानंतर रुजू झालेल्या गणेश देशमुख यांनी पाणी कराच्या थकीत रक्कमेचा आढावा घेतला असता मालमत्ता कर विभागापासून पाणी पुरवठा कर वसुली विभाग वेगळा करण्याचा निर्णयच थकीत करासाठी कारणीभूत असल्याचे पुढे आले. ही बाब लक्षात घेताच त्यांनी मालमत्ता करापासून पाणीपट्टी कर विभाग वेगळा करत नव्याने कर वसुली सुरू केली.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका