शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड तापले ! पारा @ ४२ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:39 IST

एप्रिल महिना उजाडताच वाढत्या तापमानाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरूवात केली असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी ४२ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पुढील सहा दिवस तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतापमानात वाढ : सहा दिवस उन्हाची तीव्रता राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : एप्रिल महिना उजाडताच वाढत्या तापमानाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरूवात केली असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी ४२ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पुढील सहा दिवस तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.राज्य आरोग्य विभागाने नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव व भंडारा या जिल्ह्यांतील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली असल्याने जिल्हा प्रशासनास प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याचप्रमाणे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना, जनजागृती मोहीम आणि आपतकालीन स्थितीपासून बचाव करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. यावर्षी प्रशासनाच्या वतीने यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. उष्माघात झालेल्या रूग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण, रूग्णांवर प्रथमोपचार करण्यासाठी जनजागृती तसेच मनपा कार्यक्षेत्रातील आरोग्य विभागास प्रतिबंधात्मक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या असून उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.उष्माघात कक्ष स्थापन करणार४जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालयांत उष्माघात कक्ष स्थापन करणे तसेच राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रूग्णवाहिका व पथकांची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.४दरम्यान, उष्माघाताचा त्रास जाणवत असलेल्यांनी तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानcollectorतहसीलदारHealth Tipsहेल्थ टिप्स