शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: गावातील बोअरवेल बंद, गोदावरीतील खड्ड्याने घेतला मायलेक अन् पुतणीचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:52 IST

उमरी तालुक्यातील भायेगावातील हृदयद्रावक घटना; कपडे धुण्यासाठी गोडवरीत गेलेल्या माय,लेक आणि पुतणीचा बुडून एकाच वेळी मृत्यू

उमरी (जि. नांदेड): "आई, वाचव ना!" अशा आर्त हाकेसरशी महानंदा हणमंते यांनी नदीत उडी घेतली. नदीतील खड्डा खोल असल्याने मायलेकी दोघी बुडू लागल्या हे पाहून पुतणीने लगेच बचावासाठी धाव घेतली. मात्र, गोदावरीतील खोल खड्ड्याने अखेर माय-लेक आणि पुतणी अशा तिघींचेही प्राण गिळले. महानंदा भगवान हणमंते (३५), पायल भगवान हणमंते (१३) आणि ऐश्वर्या मालू हणमंते (१३) अशी मरण पावलेल्या मायलेकींची आणि पुतणीची नावे आहेत. उमरी तालुक्यातील भायेगाव येथे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही अत्यंत हृदयविदारक घटना घडली.

गावातील बोअरवेलची विद्युत मोटार आठ दिवसांपासून बंद असल्यामुळे कपडे धुण्यासाठी महानंदा यांनी गोदावरीच्या किनाऱ्यावर जाण्याचे ठरवले. मुलगी पायल आणि पुतणी ऐश्वर्या या दोघींना घेऊन महानंदा किनाऱ्यावर आल्या. महानंदा कपडे धुण्यात व्यस्त असताना पाण्यात खेळत असलेल्या पायलचा पाय घसरला अन् ती खोल पाण्यात ओढली गेली. तिच्या मदतीच्या आर्त हाकेने आई महानंदाने वाचविण्यासाठी झेप घेतली, पण दोघीही गटांगळ्या खात बुडाल्या. हे पाहून पुतणी ऐश्वर्याने दोघींना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला, मात्र, तिचे प्रयत्न अपुरे पडले अन् तीही त्या खोल पाण्यात बुडाली. हे भयंकर दृश्य घटनास्थळी असलेल्या एका महिलेने पाहिले आणि मदतीसाठी तिने मोठ्याने आवाज दिले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्याच्या प्रवाहात बुडालेल्या तिघींचे मृतदेह गावकरी आणि पोलिसांनी नावेच्या सहाय्याने शोधून बाहेर काढले.

गावाजवळच बळेगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मोठा पाणीसाठा असतो. याच साठ्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. उमरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंकुश माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उमरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ह्या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :NandedनांदेडgodavariगोदावरीDeathमृत्यू