शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ज्ञानाच्या महासागरास पुस्तकांची आदरांजली; नांदेड विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राला लोकसहभागातून बळकटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 19:11 IST

ज्या महामानवाने पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधले,ज्यांनी या देशाची घटना लिहली, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवट पर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगले. अशा ज्ञानाच्या महासागरास नांदेड येथील नागरिकांनी पुस्तक रुपी आदरांजली अर्पण केली.

ठळक मुद्देनागरिक, कर्मचा-यांच्या योगदानातून १० हजार पुस्तकांसह साहित्य झाले उपलब्धविद्यापीठात रोजंदारीवर काम करणा-या १९ महिला कर्मचा-यांनी निधी गोळा करून केंद्रासाठी खुर्च्या उपलब्ध करुन दिल्या़केंद्राचे सव्वा लाख पुस्तकांचे उद्दीष्ट

नांदेड : ज्या महामानवाने पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधले,ज्यांनी या देशाची घटना लिहली, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवट पर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगले. अशा ज्ञानाच्या महासागरास नांदेड येथील नागरिकांनी पुस्तक रुपी आदरांजली अर्पण केली. नव्या पिढीला वाचनाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राला बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून नागरिक व कर्मचा-यांच्या योगदानातून १० हजार पुस्तकांसह इतर उपयोगी साहित्य उपलब्ध झाले. 

विद्यापीठामध्ये २०१० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यात आले़ केंद्र स्थापन झाल्यानंतर या विभागाला स्वतंत्र जागा नव्हती़ मात्र डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या केंद्राचा विस्तार करण्याची विनंती कर्मचा-यांसह अभ्यासकांनी कुलगुरुकडे केल्यानंतर विभागाला स्वतंत्र मान्यता देत़ कुलगुरुंनी जागाही उपलब्ध करुन दिली़ आणि येथुनच या अभ्यास केंद्राचा प्रवास सुरु झाला. 

लोकसहभागातून मिळाली बळकटी जागा आणि केबीन विद्यापीठाकडून मिळाले तरी इतर पायाभूत सुविधा कशा उभ्या करायच्या असा प्रश्न या केंद्राचे प्रमुख पी़विठ्ठल यांच्या पुढे उभा होता़ विठ्ठल यांनी केंद्र अधिक सुसज्ज करण्यासाठी लोकसहभागाची मदत घेण्याचे निश्चित केले़ आणि त्यांच्या या आवाहनाला केंद्रातीलच कर्मचा-यांकडून पहिला प्रतिसाद लाभला़ विद्यापीठात रोजंदारीवर काम करणा-या १९ महिला कर्मचा-यांनी प्रत्येकी ३५० ते ५०० रुपये असा निधी देऊन या केंद्रासाठी खुर्च्या उपलब्ध करुन दिल्या़ त्यानंतर इतर कर्मचा-यांसह शहरातील नागरिकांनीही अध्यासन केंद्रासाठी मदत देण्यास सुरुवात केली़ अशा लोकसहभागातूनच आता या केंद्राकडे मॅट, खुर्च्या, पडदे, डायससह, सीसीटीव्ही कॅमे-याचीही सुविधा प्राप्त झाली आहे़ एवढेच नव्हे तर केंद्रातील अभ्यासीकेमध्ये सर्व दैनिकांबरोबरच मासिकेही उपलब्ध करुन देण्यात आली असूऩ यासाठीही लोकवर्गणी लाभल्याचे समन्वयक पी़विठ्ठल यांनी सांगितले.

अध्यासन केंद्रातील सुनिल राहुळे, सुनिल ढाळे, काळबा हानवते, माधव जायभाये, संदीप एडके आदींच्या सहकार्याने केंद्रातर्फे व्याख्यानमालेसह संदर्भ ग्रंथालय, ई-रिसोर्सेस, चर्चासत्र, कार्यशााळा आदी उपक्रमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले़ लोकसहभागातून पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने़ अध्यासन केंद्रातर्फे राबविण्यात येत असलेल्या १ वर्षाच्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन फुले आंबेडकर थॉट’ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होत आहे़ माजी कुलगुरु डॉ़ नागनाथ कोत्तापल्ले यांनी नुकतीच या अध्यासन केंद्राला भेट दिली असता़ या उपक्रमासोबतच लोकसहभागाचे त्यांनी कौतुक केले़

केंद्राचे सव्वा लाख पुस्तकांचे उद्दीष्टडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अध्यासन केंद्रातील कर्मचा-यांनी विविध विषयांवरील १ लाख २५ हजार पुस्तके केंद्रात उपलब्ध करुन देण्याचे लक्ष ठेवले आहे़ या अनुषंगाने समाजातील अनेकांना अध्यासन केंद्राला पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे़ या आवाहनालाही  नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असूऩ सुमारे १० हजारांवर पुस्तके विविध स्तरातील नागरिकांनी केंद्राला भेट म्हणुन दिली आहेत़ या पुस्तकांचा विद्यार्थ्यांसह अभ्यासकांनाही फायदा होणार आहे.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडNandedनांदेडDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर