शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात २९ जणांना चक्क तहसीलच पुरविते अफू, प्रत्येकाचा कोटा ठरलेला; अफू आणण्यासाठी कर्मचारी नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 11:28 IST

नांदेड तहसील कार्यालयाकडे २९ जणांना अफूचे व्यसन करण्याचा अधिकृत परवाना देण्यात आल्याची नोंद आहे. दर महिन्याला त्यांच्यासाठी साडेतीनशे डबी अफू मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणला जातो.

शिवराज बिचेवार - 

नांदेड :नांदेडात सोमवारी एनसीबीने अफूच्या अड्ड्यावर धाड मारून मुद्देमाल जप्त केला. मात्र, नांदेड शहरात २९ परवानाधारक अफू घेणारे असून, त्यांना तहसील कार्यालयाकडूनच दर महिन्याला ठरावीक कोट्याची अफू पुरविली जात असल्याचे समोर आले आहे. नांदेड तहसील कार्यालयाकडे २९ जणांना अफूचे व्यसन करण्याचा अधिकृत परवाना देण्यात आल्याची नोंद आहे. दर महिन्याला त्यांच्यासाठी साडेतीनशे डबी अफू मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आणला जातो. एका डबीत पाच ग्रॅम अफूच्या गोळ्या असतात. त्यासाठी अगोदर परवानाधारकाकडून ठरावीक रक्कम भरून घेतली जाते. त्या रकमेचे चलान करून ती मागविण्यात येते. त्यानंतर तहसील कार्यालयातूनच त्याचे वाटप होते. या सर्व वाटपाची नोंद केली जाते. त्यावर खरेदीदार आणि त्यापुढे तहसीलदारांची स्वाक्षरी असते. हे २९ परवानाधारक हे अफूच्या आहारी गेले आहेत. वेळेवर अफू न मिळाल्यास ते अस्वस्थ होतात. त्यामुळे तहसील कार्यालयाला त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. पूर्वी ही संख्या शंभराहून अधिक होती. ती आता २९ वर आली आहे. नव्याने मात्र कुणालाही अफूचा परवाना दिला जात नसल्याचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी सांगितले.     अफू परवानाधारकांची दरवर्षी जिल्हा शल्य चिकित्सकाकडून तपासणी करण्यात येते. त्यांच्या शरीरासाठी अफू का गरजेचे आहे, याचा अहवाल दिला जातो. त्यानंतरच त्या परवानाधारकाला ती अफीम मिळते.   

अफू आणण्यासाठी कर्मचारी नियुक्तदर महिन्याला मुंबईहून अफू आणण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत एक राज्य उत्पादन शुल्कचा एक गार्ड असतो. अफू आणणे खूप जिकिरीचे काम असल्यामुळे हा कर्मचारी मुंबईला कधी जाणार याबाबत गोपनीयता बाळगली जाते. 

टॅग्स :NandedनांदेडTahasildarतहसीलदार