शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नांदेडात गोदावरी पात्रातील सक्शन पंप जिलेटीनने उडविला; महसूल विभागाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 6:46 PM

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नांदेड तहसीलदारांची कारवाई

- अनुराग पोवळे 

नांदेड : गोदावरी नदीतून कोणतीही परवानगी न घेता थेट सक्शन पंपाचा वापर करुन वाळू उपसा सुरू असल्याची बाब कळाल्यानंतर नांदेड तहसील प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणारा सक्शन पंप जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने उडवूनच टाकला. मराठवाड्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध पहिलीच अशी बेधडक कारवाई झाली आहे.

तालुक्यातील राहेगाव येथे गोदावरी नदीत सक्शन पंप टाकून वाळू उपसा केला जात होता. याबाबत नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांना तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची शहानिशा करताना नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तहसीलदार २१ एप्रिल रोजी राहेगाव येथे पोहोचले. हे पथक गावात दाखल होताच गोदापात्र परिसरात सामसूम पसरली. राहेगाव येथे एक सक्शन पंप गोदावरी नदीत बसवलेला आढळला.  या पंपाद्वारे वाळू उपसा करुन त्याची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. ही वाहतूक दिवसा न होता रात्री सुरू होती. गोदावरी काठावर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांसाठी धक्काही तयार करण्यात आला होता. 

नायब तहसीलदार काकडे यांनी सदर बाब नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांना कळविली. गोदावरी पात्रात सक्शन पंप असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनाही सदर प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यावेळी सदर ठिकाणी वापरण्यात येणारा सक्शन पंप नष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले. या कारवाईदरम्यान स्वत: तहसीलदार अंबेकर हे घटनास्थळी पोहोचले. राहेगाव येथे पोलीस बंदोबस्तही बोलावण्यात आला होता. गोदावरी पात्रात असलेल्या सक्शन पंपावर जिलेटीन कांड्या लावण्यात आल्या. या कांड्यांचा स्फोट घडवत सदर सक्शन पंप पूर्णपणे नष्ट करण्यात आला. 

ते फोन कोणाचे ?राहेगाव येथे नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाने सक्शन पंप जप्त केल्याची कारवाई झाल्यानंतर या प्रकरणात तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना मोबाईलद्वारे अनोळखी नंबरवरुन मोबाईलद्वारे सदर प्रकरणाकडे कानाडोळा करावा, असे सांगण्यात येत होते. ते फोन नेमके कोणाचे होते, वाळूमाफियांना कोणाचे पाठबळ होते, याचा पोलीस तपास सुरू आहे.

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभागgodavariगोदावरी