शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: मासेमारी सुरू करताच अचानक वादळी वारा सुटला, एकजण तलावात बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:24 IST

२४ तास उलटूनही अद्याप मासेमाराचा शोध लागला नाही; कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील घटना

कंधार/दिग्रस खुर्द (नांदेड) : मासेमारी करण्यासाठी गेलेले भिमराव संभाजी सोनकांबळे हे अचानक वादळ वारा आल्याने तलावात बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता दिग्रस खुर्द येथे घडली. तलावाच्या बाजूला कपडे, मोबाईल, चप्पल, मासेमारीचे जाळे आढळून आले आहे. यावरून सोमवारी रात्री आणि आज सकाळपासून तलावात शोधकार्य सुरू असून २४ तास उलटूनही अद्याप यश आले नाही. 

तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील भिमराव संभाजी सोनकांबळे (५०) हे गावाच्या जवळ असलेल्या तलावामध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छोटीशी होडी घेऊन मासेमारी करण्यासाठी उतरले होते. मात्र, त्यादरम्यान सोसाट्याचा वारा सुटून जोरदार वादळीवारे वाहू लागले. वातावरण शांत झाल्यानंतर एका शेतकऱ्यास तलावाच्या बाजूला कपडे, मोबाईल, चप्पल, मासेमारीचे जाळे आढळून आले. मात्र, तलावात कोणीच नव्हते. शेतकऱ्याने याची माहिती गावात दिली. त्यानंतर सोनकांबळे यांच्या नातेवाइकांनी तलावाकडे धाव घेतली. तलावाच्या जवळ आढळून आलेल्या वास्तूवरून सोनकांबळे तलावात बुडाले असल्याचा संशय नातेवाईकांना आला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री अंधार असल्याने शोधकार्य करता आले नाही. 

२४ तास उलटूनही शोध सुरूचदरम्यान, आज, मंगळवारी सकाळपासून नवरंगपुरा येथील मासेमारी करणाऱ्यांनी तलावात शोधकार्य सुरू केले. मात्र, अद्याप यश प्राप्त झाले नाही. उपविभागीय अधिकारी पोलीस कंधार यांची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. साडेतीन वाजेच्या सुमारास मुखेडवरून आलेले मासेमारी करणारे काहीजण शोधकार्य करत असल्याची माहिती माजी सरपंच सत्यजित सोनकांबळे यांनी दिली. तब्बल २४ तास उलटूनही सोनकांबळे यांचा शोध लागला नसल्याने नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी विविध विभागाच्या अधिकारी यांनीही भेट दिली.

टॅग्स :Nandedनांदेड