शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पाच मिनिटे थांबले नांदेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:27 IST

मृत्यूनंतर आपले अवयव इतरांच्या कामी यावेत यासाठी अवयवदानाची चळवळ सुरु करण्यात आली़ या चळवळीला नांदेडकरांनी सुरुवातीपासूनच भरभरुन प्रतिसाद दिला आहे़

ठळक मुद्देचौथ्यांदा ग्रीन कॉरिडोर पहिल्यांदाच होणार किडनी प्रत्यारोपणही

नांदेड : मृत्यूनंतर आपले अवयव इतरांच्या कामी यावेत यासाठी अवयवदानाची चळवळ सुरु करण्यात आली़ या चळवळीला नांदेडकरांनी सुरुवातीपासूनच भरभरुन प्रतिसाद दिला आहे़ नांदेडातील हजारो जणांनी अवयवदानासाठी नोंदणीही केली आहे़ त्यात गेल्या वर्षभराच्या काळात नांदेडात सलग चौथ्यांदा ग्रीन कॉरिडोर करण्यात आला़ बुधवारी हृदय घेवून निघालेल्या रुग्णवाहिकेसाठी ५ मिनिटे १२ सेकंद शहर जागेवरच थांबले होते़ नांदेडकरांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ताफ्यातील डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीही कौतुक केले़विष्णूपुरीतील शासकीय रुग्णालयातून सर्वात प्रथम सुधीर रावळकर या युवकाच्या अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडोर करण्यात आला़ शासकीय रुग्णालय ते विमानतळ असे जवळपास पंधरा किमींचे अंतर अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण करण्यात आले होते़ त्यामुळे डॉक्टरांसह प्रशासनाचा आत्मविश्वासही वाढला होता़ त्यानंतर आठच दिवसांत याच ठिकाणाहून आणखी एक ग्रीन कॉरिडोर करण्यात आला़ त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच ग्लोबल हॉस्पिटलमधून तिसरा ग्रीन कॉरिडोर करण्यात आला़बुधवारी नांदेडात चौथ्यांदा ग्रीन कॉरिडोर यशस्वीरित्या पार पडले़ त्यासाठी अख्खी यंत्रणा मंगळवारी रात्रीपासून कामाला लागली होती़ शहर वाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांच्यासह त्यांची सर्व टीम पहाटेपासूनच रस्त्यावर उतरली होती़ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळाकडे जाणा-या रस्त्यावर पावला-पावलावर कर्मचाºयांना तैनात करण्यात आले होते़ शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकही आपल्या कर्मचा-यांसह रस्त्यावर उभे होते़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास ग्रीन कॉरिडोरची तयारी अंतिम टप्प्यात येताच विमानतळाकडे जाणाºया रस्त्यावरील सर्व वाहतूक थांबविण्यात आली होती़ अंतर्गत रस्त्यावर कर्मचारी तैनात करुन वाहतूक थांबविण्यात आली होती़१२ वाजून २९ मिनिटांनी ग्लोबलमधून ताशी १०० किमीच्या गतीने निघालेली रुग्णवाहिका अवघे ५ मिनिटे १२ सेकंदात विमानतळावर पोहोचली़ ही पाच मिनिटे जणू नांदेड शहर जागेवरच थांबले होते़ रुग्णवाहिकेच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण होवू नये यासाठी नांदेडकर स्वत: खबरदारी घेत होते़ त्यानंतर विमानाने हृदय मुंबईला पाठविण्यात आले़विमानात हृदय पोहोचविताच या पथकातील डॉक्टर आणि पोलीस कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ कॉरिडोर यशस्वी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर दिसत होते़ त्यानंतर काही वेळातच रुग्णवाहिकेने किडनी आणि यकृत औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले़ ही रुग्णवाहिका शहराबाहेर जाईपर्यंत वाहतूक रोखली होती़ ग्रीन कॉरिडोरसाठी नांदेडकरांनी दाखविलेल्या उत्साहाचे डॉक्टर आणि पथकातील कर्मचाºयांनीही कौतुक केले़ रस्त्यावर दोन्ही बाजूंनी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती़ग्रीन कॉरिडोरला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादनांदेडकर जनतेने या ग्रीन कॉरिडोरसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाग़्लोबल हॉस्पिटल ते विमानतळापर्यंतच्या रस्त्यावर नागरिक स्वत:हून रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होवू नये याची काळजी घेत होते़ आॅटोचालकही स्वत: रस्ता मोकळा करण्यासाठी मदत करीत होते़ जो-तो आपापल्या परिने या ग्रीन कॉरिडोरसाठी योगदान देत होता़ याचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याची प्रतिक्रिया शहर वाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांनी दिली़तिसºया ग्रीन कॉरिडोरच्या वेळी वेगाने असलेल्या रुग्णवाहिकेसमोर अचानक एक जनावर आले होते़ यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत जनावराला चुकविले होते़ त्यामुळे यावेळी जनावरे रस्त्यावर येवू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती़ रस्त्याच्या कडेला असलेल्या जनावरांना कॉरिडोर सुरु होण्यापूर्वीच पिटाळून लावण्यात आले होते़ त्यामुळे जनावरांचा अडथळा निर्माण झाला नाही़

  1. सकाळी नऊ वाजेपासूनच रुग्णालयात शस्त्रक्रियेची तयारी
  2. शहर वाहतूक शाखा अन् पोलीस कर्मचारीही उतरले रस्त्यावर
  3. दुपारी बारा वाजता शस्त्रक्रिया पूर्ण होताच पोलिसांना माहिती
  4. पोलिसांनी लगेच रुग्णालय ते विमानतळ जाणाºया रस्त्यावरील वाहतूक अडविली
  5. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी ग्रीन कॉरिडोरला सुरुवात
  6. १२ वाजून ३४ मिनिटे १२ सेकंदात हृदय घेवून निघालेली रुग्णवाहिका विमानतळावर
  7. हृदय विमानात ठेवल्यानंतर दहा मिनिटांत विमान मुंबईसाठी हवेत
टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलNanded civil hospitalजिल्हा रुग्णालय नांदेड