नांदेड : नांदेड शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा आणि वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे़ गत आठवडाभरात शहर व जिल्ह्यातील अट्टल असलेल्या १३ गुन्हेगारांना वर्षभरासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़ त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे़शहरात मटका किंगमधील वादानंतर एकमेकांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या़ त्यात वजिराबाद भागात हवेत गोळीबारही झाला होता़ या प्रकरणात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे या गुन्हेगारांबाबत असलेल्या तडीपारीच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा केला होता़त्यानंतर मटका किंग अन्वर शेख, कमल यादव व विक्की यादव या तिघांना वर्षभरासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले होते़ त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी दीपक तारासिंह मोहिल (ठाकूर) रा़चिरागगल्ली, जफरखान नजिरखान रा़मिलगेट व संजूसिंग ऊर्फ रघू राजेंद्रसिंघ बावरी रा़नवा कौठा या तिघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली़ त्यात आता एकाच वेळी आणखी सात जणांवर तडीपारीचे अस्त्र उगारण्यात आले आहे़त्यामध्ये शेख मुजाहिद शेख अहेमद रा़सिद्धनाथपुरी, चौफाळा, मिर्झा जुबेर बेग मिर्झा खाजा बेग रा़बिलालनगर, कैलाश जगदिश बिघानिया रा़जुना कौठा, विशाल यशवंत नरवाडे रा़तानाजीनगर, किरण भास्कर माने रा़भावेश्वरनगर, चौफाळा, मिर्झा वहाब बेग व मिर्झा वाहेद बेग मिर्झा खाजा बेग रा़बिलालनगर अशा एकूण सात जणांना एक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़गत आठवडाभरात अशाप्रकारे एकूण १३ अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणात नांदेडात पहिल्यांदाच तडीपारीची कारवाई झाली आहे़ त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे़डांबराचे आरोपी पकडण्यासाठी पथकेडांबर घोटाळ्यात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली होती़ यामध्ये आणखी तीन आरोपी फरार असून गुन्हा दाखल होवून तीन महिने उलटले तरी हे आरोपी पोलिसांना सापडत नाहीत़ या विषयावर उपअधीक्षक अभिजित फस्के म्हणाले, तीन आरोपींच्या शोधासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत़ त्यासाठी पथकेही पाठविण्यात आली आहेत़ लवकरच या फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील़शहर व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कठोर पावले उचलण्यात आली असून फरार असलेल्यांच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आली आहेत़ गत आठ दिवसांत १३ आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे़ आणखीही काही आरोपी रडारवर आहेत़ त्याचबरोबर शहर वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेवून मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली़
आरोपींच्या तडीपारीचा नांदेड पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:51 IST
नांदेड शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा आणि वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे़
आरोपींच्या तडीपारीचा नांदेड पॅटर्न
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची कारवाईआठवडाभरात अट्टल असलेल्या १३ जणांवर जिल्हाबंदी