शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या पासपोर्ट सेवा केंद्रात तीन दिवसांत झाली ५७ जणांच्या कागदपत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:47 IST

नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़

नांदेड :  नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़ दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील नागरिकांचा पासपोर्ट काढणाऱ्यांमध्ये समावेश आहे़ 

नांदेड येथील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे विदेशात जाणाऱ्या नागरिकांच्या पासपोर्ट काढण्यासाठी पुणे अथवा नागपूर येथे होणाऱ्या चकरा बंद झाल्या आहेत़  शनिवारपासून सदर कार्यालय नांदेडात कार्यान्वित झाले आहे़ दरम्यान, आॅनलाईन नोंदणी केलेल्या जवळपास ५७ जणांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली़ पुढील महिनाभरात त्यांना पासपोर्ट मिळेल़ 

यामध्ये शिक्षणासाठी तसेच पर्यटनासाठी विदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ पासपोर्टसाठी आधार, मतदान ओळखपत्र, रहिवासी, पॅन कार्ड, जन्म दाखला इ. कागदपत्रे लागतात़ या सर्व कागदपत्रांच्या आधारे आॅनलाईन अर्ज केल्यानंतर पडताळणी होऊन महिनाभरामध्ये पासपोर्ट मिळू शकते़ तर एका व्यक्तीला दीड हजार अथवा दोन हजार रूपये शुल्क आकारले जाते़ दोन हजार रूपयांमध्ये ७२ पानांचा पासपोर्ट तर दीड हजार रूपयांमध्ये ३६ पानांचा पासपोर्ट मिळतो़ 

अशी आहे पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी करावी़ यासाठीचे शुल्कदेखील आॅनलाईन अथवा के्रडीट कार्डद्वारे करावे लागेल़ कागदपत्रे पडताळणीसाठी नांदेड सेंटरची निवड करावी़ अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर एआरएन सीटची प्रिंटआॅऊट काढून घ्यावी़ त्यावर दिलेल्या वेळेनुसार नांदेड येथील डाकघर पासपोर्ट सेवा केंद्रात पडताळणीसाठी उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी़ यानंतर सदर प्रस्ताव पुणे कार्यालयाकडे पाठविण्यात येतो़ पुढे पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी केली जाते़ या अहवालानंतर पासपोर्ट सादर केला जातो़ तो अर्जामध्ये दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने आपल्या घरी येईल. नागपूर, पुणे येथील कार्यालयाची माहिती नसल्याने एजंटामार्फत पासपोर्ट काढावा लागत असे़ त्यासाठी शुल्क वगळता दोन ते चार हजार रूपये एजंट घेत असे़ परंतु, नांदेडात केंद्र सुरू झाल्याने एजंटासह नागपूर, पुणे जाण्या-येण्याचा खर्च, तिथे एक दिवस राहणे, जेवण आदी जवळपास आठ ते दहा हजार रूपये खर्च अन् वेळेची बचत होत आहे़

टॅग्स :passportपासपोर्टNandedनांदेडStudentविद्यार्थीTravelप्रवासGovernmentसरकार