शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्र श्रेयाच्या चढाओढीत पत्रिकांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:25 IST

नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़

ठळक मुद्देपासपोर्ट सेवा केंद्राचा आज प्रारंभ : एका कार्यक्रमाच्या तीन पत्रिका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़नांदेडकरांना पासपोर्ट सहज व सुलभ उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नांदेडात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला़ परंतु त्याच्या उद्घाटन पत्रिकेवरुन मात्र सध्या मोठा गहजब सुरु आहे़ पहिल्या पत्रिकेत दोन्ही विद्यमान आमदारांच्या नावापुढे चक्क संसद सदस्य विधानसभा असा उल्लेख करण्यात आला होता़ शिष्टाचाराचे धिंडवडे उडविणारी ही पत्रिका व्हायरल झाल्यामुळे दुसऱ्यांदा नव्याने पत्रिका छापण्यात आल्या़ त्या पत्रिकेत पालकमंत्री रामदास कदम, खा़ अशोकराव चव्हाण, खा़ राजीव सातव, खा़ सुनील गायकवाड, आ़ हेमंत पाटील, आ़ डी़पी़सावंत, महापौर शीला भवरे आणि मनीष गुप्ता यांचीच नावे होती़ या पत्रिकेवरुनही मोठा गोंधळ निर्माण झाला़ याबाबत शिष्टाचार अधिकाºयांची झाडाझडतीही घेण्यात आली़ त्यानंतर क्रमांक दोनच्या पत्रिकांचे वाटप थांबविण्यात आले़ त्यानंतर शनिवारी सकाळी तिसरी पत्रिका काढण्यात आली़या पत्रिकेत उपस्थितीमध्ये पालकमंत्री रामदास कदम, उद्घाटन खा़अशोकराव चव्हाण करणार असल्याचे नमूद असून जि़प़अध्यक्षा शांताबाई पवार, खा़राजीव सातव, खा़सुनील गायकवाड, महापौर शीला भवरे, आ़अमरनाथ राजूरकर, आ़हेमंत पाटील, आ़विक्रम काळे, आ़सतीश चव्हाण, आ़डी़पी़सावंत, संयुक्त सचिव मनीष गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, मनपा आयुक्त गणेश देशमुख यांची नावे टाकण्यात आली आहेत़ या पत्रिकेवरही काही जणांतून नाराजीचा सूर उमटत आहे़ उद्घाटनापूर्वी पासपोर्ट सेवा केंद्र पत्रिकेच्या घोळामुळे चर्चेत आले आहे़ तर दुसरीकडे डाक अधीक्षक अली यांनी पत्रिकाच छापल्या नसल्याचे सांगितले़ शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिका न छापताच उद्घाटक, प्रमुख पाहुण्यांना कसे निमंत्रित केले गेले? हा प्रश्नही उपस्थित होतो़सध्या डिजिटलचा जमाना आहे़ त्यामुळे या कार्यक्रमाची पत्रिका आम्ही छापलीच नाही़ संगणकावर पत्रिका तयार करुन ती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविण्यात येत आहे़ आमदारांचा सांसद सदस्य असा उल्लेख हा ५ तारखेच्या पत्रिकेत होता, अशी प्रतिक्रिया डाक अधीक्षक एस़ एम़ अली यांनी दिली़

टॅग्स :passportपासपोर्टAshok Chavanअशोक चव्हाणRamdas Kadamरामदास कदमD.P. Sawantडी. पी. सावंत