शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नांदेड मनपाच्या १८ लिपिकांना नोटीस; मालमत्ता करवसुलीत हलगर्जीपणाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 11:19 AM

शहरातील मालमत्ता धारकांकडून आगामी चार महिन्यांत १४० कोटींच्या करवसुलीचा डोंगर उभा असतानाही मनपाच्या कर वसुली कर्मचा-यांकडून हलगर्जी होत असल्याचा ठपका ठेवत १८ वसुली लिपिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्देमहापालिका हद्दीत १ लाख ११ हजार मालमत्ताधारक आहेत. चालू आर्थिक वर्षात १५८ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यातील १३ कोटी ६० लाखांची करवसुली मनपाने नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण केली आहे. उर्वरित कालावधीत जवळपास १४० कोटींच्या करवसुलीचे आव्हान आहे.

नांदेड : शहरातील मालमत्ता धारकांकडून आगामी चार महिन्यांत १४० कोटींच्या करवसुलीचा डोंगर उभा असतानाही मनपाच्या कर वसुली कर्मचा-यांकडून हलगर्जी होत असल्याचा ठपका ठेवत १८ वसुली लिपिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यावरही कर वसुलीचे प्रमाण न वाढवल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा त्यांना इशारा देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीत १ लाख ११ हजार मालमत्ताधारक आहेत. चालू आर्थिक वर्षात १५८ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यातील १३ कोटी ६० लाखांची करवसुली मनपाने नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण केली आहे. उर्वरित कालावधीत जवळपास १४० कोटींच्या करवसुलीचे आव्हान आहे. करवसुलीचा हा डोंगर असताना जवळपास १८ कर वसुली लिपिकांच्या वसुलीचे प्रमाण हे ५ टक्क्यांहून कमीच आढळले आहे.  परिणामी अशा कर वसुली लिपिकांवर कामात हयगय व निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात येवून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा मिळताच २४ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्याचवेळी आगामी कालावधीत कर वसुलीचे प्रमाण न वाढल्यास शिस्तभंगाईचा कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला. त्यामुळे कर वसुली लिपिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या कर वसुलीकडे आयुक्तांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ६ नोव्हेंबरपासून शहरात कर वसुलीची विशेष मोहीमही हाती घेण्यात आली आहे. या विशेष कर वसुली मोहिमेत शास्ती माफीची योजनाही लागू केली आहे. या योजनेला शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत २ कोटी ६३ लाखांची करवसुली महापालिकेने केली आहे. या  वसुलीतूनच शहरातील आगामी  कालावधीत विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत. त्याचवेळी मागील अनेक वर्षांपासूनची थकित देयकेही अदा करण्याचा प्रयत्न मनपाकडून केला जात आहे.  त्यामुळे वसुली कमी राहणा-या कर्मचा-यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेला मिळणा-या अनेक योजनांचे अनुदान सध्या शासनस्तरावरुन बंद असल्याने महापालिकेची जणू आर्थिक कोंडीच झाली आहे. या स्थितीत मनपाला कर वसुली या प्रमुख स्त्रोतावरच अवलंबून  राहण्याची वेळ आली आहे. 

पाणी कराचे १ कोटी २० लाख वसूलशहरात असलेल्या ५५ हजार ३४७ नळधारकांकडे नेमकी किती पाणीपट्टी थकित आहे याचा आकडा मनपाला सापडला नसला तरी नोव्हेंबर १७ मध्ये १ कोटी १९ लाखांची पाणीकर वसुली पूर्ण झाली आहे. शहरात असलेल्या नळधारकांना मनपाने मागील दोन वर्षे पाणीकराची मागणीच केली नव्हती. सॉफ्टवेअरमधील बिघाडाचे कारण त्यासाठी सांगितले जात असले तरीही आता मनपाने पाणीबिल तयार केले आहे. ही पाणी देयके  नळधारकांना वाटप करुन त्यांच्याकडून पाणीपट्टीची मागणी केली जाणार आहेत. यातही आता नेमकी किती पाणीपट्टीची  मागणी केली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.शहरातील अनेक नळधारकांना पाणीपट्टी भरुनही शास्ती आकारण्यात आल्याचे प्रकार पुढे आले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर