शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नांदेड मनपा प्लास्टिकबंदीसाठी पुन्हा मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:43 IST

शुक्रवारी व्यापाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ 

नांदेड : प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर महापालिकेने शहरात धडक मोहीम राबवून अनेक व्यापाऱ्यांवर धाडी मारल्या होत्या़ यावेळी लाखो रुपयांच्या कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या़ परंतु, त्यानंतर प्लास्टिकबंदीचा महापालिकेला विसर पडला होता़ अनेक विक्रेतेही सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करीत होते़ त्यात आता मनपाला पुन्हा एकदा प्लास्टिकबंदीची आठवण झाली असून शुक्रवारी व्यापाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ 

मनपा आयुक्त लहुराज माळी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले होते़ त्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली होती़ तसेच प्रभागात ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरुपात घ्यावा़ उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या सूचना माळी यांनी दिल्या होत्या़ 

त्यानुसार शुक्रवारी इंडिया गोळी बिस्कीट, स्वामी समर्थ किराणा या दुकानदारास प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला़ पांपटवार किराणा दुकानास दुसऱ्यावेळी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे दहा हजार रुपये दंड लावला़ क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शिंगे व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली़ झोन क्रमांक ४ अंतर्गत प्रभाग क्रमांक १५,१७ व १८ मध्ये सहा जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड लावण्यात आला़ त्यात कोहीनूर कलेक्शन, कबीर मेन्सवेअर, स्वीस बेकरी, किड्स क्लब, स्मार्ट लुक मेन्सवेअर, दीप कर्टन यांचा समावेश आहे़ तर उघड्यावर घाण करणाऱ्या दोघांकडून ६५० रुपये दंड वसूल केला़ शिवाजी डहाळे, गुलाम सादेक यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम तडवी, गोविंद थेटे, अतिख अन्सारी यांनी ही कारवाई केली़ 

दरम्यान, एवढे दिवस थंड पडलेली प्लास्टिकबंदीच्या विरोधातील मोहीम पुन्हा सुरु करण्यात आली असून त्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत़ दरम्यान, प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर नांदेडातील अनेक विक्रेत्यांनी स्वत:हून कॅरिबॅग वापरणे बंद केले होते़ त्याचबरोबर नागरिकही कापडी पिशव्यांचा वापर करीत होते़ कॅरिबॅग बंदीच्या निर्णयामुळे कापडी पिशव्यांना चांगले दिवस आले  आहेत़ महापालिकेलाही कापडी पिशव्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे़ परंतु, अद्यापही महापालिकेच्या पिशव्या बाजारात आल्याच नाहीत़ या पिशव्यावरुन मध्यंतरी राजकारण बरेच तापले   होते़ त्यामुळे या पिशव्यांना विलंब लागत आहे़ 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाNandedनांदेड