शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नांदेड महापालिकेचा सुधारित कर्मचारी आकृतीबंध आज होणार सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:03 IST

महापालिकेचा बहुचर्चित कर्मचारी आकृतीबंध शुक्रवारी पुन्हा एकदा नव्याने राज्य शासनाकडे सादर होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला कर्मचारी आकृतीबंध नव्याने सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते.

नांदेड : महापालिकेचा बहुचर्चित कर्मचारी आकृतीबंध शुक्रवारी पुन्हा एकदा नव्याने राज्य शासनाकडे सादर होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला कर्मचारी आकृतीबंध नव्याने सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते.महापालिकेची स्थापनेपासून मनपाचा कर्मचारी आकृतीबंध अद्याप मंजूर झाला नाही. आहे त्याच कर्मचाऱ्यावर काम भागविले जात आहे. त्यातच अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचा-यावर कामाचा भार वाढला आहे. ३ सप्टेंबर २०१८ रोजी महापालिकेने कर्मचा-यांचा सुधारित आकृतीबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यात सुधारणा करुन हा आकृतीबंध पाठविण्याची सूचना शासनाने महापालिकेला केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव परत आला होता. पुन्हा नव्याने हा प्रस्ताव विभागवार शासनाला १४ डिसेंबर रोजी पाठविला जाणार आहे. यामुळे हा आकृतीबंध मंजूर होईल की नाही याकडे सर्व अधिकारी-कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे.दुसरीकडे महापालिका स्थापनेपासून अद्याप कर्मचारी आकृतीबंध पूर्ण न झाल्याने अनेक आवश्यक पदे भरता आली नाहीत. ३ सप्टेंबर रोजी पाठविण्यात आलेल्या आकृतीबंधात ११ नव्या पदांची निर्मिती करण्यात आली होती. आजघडीला २ हजार ३३२ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.महापालिकेला पहिला कर्मचारी आकृतीबंध ५ सप्टेंबर रोजी २०१५ रोजी शासनाकडे पाठविला होता. अधिकारी- पदाधिकाºयांच्या वादातून तो मंजूर झाला नाही. शासनस्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या. तत्कालीन महापौर आणि खा. अशोकराव चव्हाण यांनी आकृतीबंधासंदर्भात २२ जानेवारी २०१६ रोजी शासनाला पत्र देत आक्षेप नोंदविला होता.त्यामुळे शासनाने २८ जानेवारी २०१६ रोजी महापालिकेला सुधारित आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश दिले होेते. तो ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. तो आता पुन्हा विभागवार पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाEmployeeकर्मचारी