शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपा निवडणूक: संथ सुरुवातीनंतर सायंकाळी मतदारांच्या रांगा, वेळ संपल्याने अनेक निराश

By अविनाश पाईकराव | Updated: January 15, 2026 18:29 IST

दुपारी चार वाजेनंतर मात्र शहरातील चित्र पूर्णपणे बदलले आणि मतदारांनी मतदानासाठी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. 

- अविनाश पाईकरावनांदेड: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला असला तरी, सायंकाळच्या सत्रात मतदारांनी केंद्रांबाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र, साडेपाच वाजेची वेळ संपल्यानंतर पोलिसांनी मतदान केंद्रांचे गेट बंद केले. त्यानंतर आलेल्या अनेक मतदारांना निराश होऊन परतावे लागले.

सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत केवळ ७.१६ टक्के मतदान झाले होते. जसजसा दिवस सरकला तसतसा मतदानाचा टक्का वाढत गेला. दुपारी ११:४० वाजेपर्यंत १७.१४ टक्के, तर दुपारी ३:३० वाजेपर्यंत सरासरी ४१.६७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. प्रभागनिहाय विचार करता प्रभाग क्रमांक ११ हैदरबाग येथे सर्वाधिक ५१.५ टक्के, तर प्रभाग क्रमांक ६ गणेशनगर भागात सर्वात कमी २९.८९ टक्के मतदान झाले होते. दुपारी चार वाजेनंतर मात्र शहरातील चित्र पूर्णपणे बदलले आणि मतदारांनी मतदानासाठी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. 

निवडणूक विभागाकडून सायंकाळी ५:३० वाजेनंतर येणाऱ्या मतदारांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने, मतदारांनी त्यापूर्वीच केंद्रात पोहोचण्यासाठी धावपळ केली. मतदान केंद्रांमध्ये शिरण्यासाठी मतदारांची मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत अनेक प्रभागांत मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप झाल्याची चर्चाही मतदारांमध्ये रंगली होती. ज्या मतदारांना पैसे मिळाले नाहीत, अशा काही नाराज मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचेही काही भागात दिसून आले. एकूणच संथ सुरुवातीनंतर शेवटच्या काही तासांत मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे मतदानाचा अंतिम टक्का वाढण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Municipal Elections: Slow Start, Evening Rush, Many Disappointed.

Web Summary : Nanded municipal elections saw a slow start but gained momentum in the evening. Many voters were turned away after the 5:30 PM deadline. Some voters allegedly boycotted voting due to not receiving money. Overall voting percentage likely to increase.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका