शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड - दिल्ली विमानसेवेला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:04 IST

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत नांदेडातील विमानसेवेला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत़ यापूर्वी नांदेडातून मुंबई, हैदराबाद आणि अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे़ त्यात आता देशाच्या राजधानीचीही भर पडली असून येत्या १९ नोव्हेंबरपासून नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरु होणार आहे़ आठवड्यातून दोन दिवस ही सेवा राहणार असून त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे़ त्याचबरोबर सचखंड, जम्मूतावी या एक्स्प्रेसवरील ताणही कमी होणार आहे़

ठळक मुद्दे१९ नोव्हेंबरपासून आठवड्यात सोमवार अन् गुरुवार दोन दिवस सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत नांदेडातीलविमानसेवेला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत़ यापूर्वी नांदेडातून मुंबई, हैदराबाद आणि अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे़ त्यात आता देशाच्या राजधानीचीही भर पडली असून येत्या १९ नोव्हेंबरपासून नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरु होणार आहे़ आठवड्यातून दोन दिवस ही सेवा राहणार असून त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे़ त्याचबरोबर सचखंड, जम्मूतावी या एक्स्प्रेसवरील ताणही कमी होणार आहे़नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक येतात़ परंतु, विमानसेवेच्या अडचणीमुळे भाविकांचीही गैरसोय होत होती़ त्यात ब-याच पाठपुराव्यानंतर नांदेडहून मुंबई, हैदराबाद आणि आता काही दिवसांपूर्वीच अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे़ या विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे़परंतु, नांदेडात येणा-या भाविकांमध्ये दिल्ली, हरियाणा यासह इतर ठिकाणांहून येणाºया भाविकांची संख्याही अधिक आहे़ या भाविकांना नांदेडला येण्यासाठी रेल्वेवरच अवलंबून रहावे लागत होते़त्यामुळे सचखंड, जम्मूतावी या गाड्यांवर त्याचा परिणाम होत होता़ प्रवाशांना वेळेवर या गाड्यांचे आरक्षणही मिळत नव्हते़ त्यामुळे नांदेडहून दिल्ली विमानसेवा सुरु करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती़ सण-उत्सवाच्या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती़ त्यामुळे सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सातत्याने नांदेड-दिल्ली विमानसेवेसाठी पाठपुरावा करण्यात येत होता़त्यावर एअर इंडियाच्या वतीने १९ नोव्हेंबरपासून नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे़आठवड्यात सोमवार आणि गुरुवारी ही सेवा सुरु राहणार आहे़ ही विमानसेवा सुरु झाल्यानंतर भाविकांना आता नांदेड ते दिल्ली, अमृतसर, मुंबई आणि हैदराबाद शहरांमध्ये पोहोचण्यासाठी मोठी सोय झाली आहे़ ही विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाचे गुरुद्वारा बोर्डाने स्वागत केले आहे़

टॅग्स :NandedनांदेडairplaneविमानAir Indiaएअर इंडिया