‘नीट’मध्ये नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:41 AM2018-06-05T00:41:45+5:302018-06-05T00:41:45+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रमाणपत्र परीक्षेत (नीट) नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे़

Nanded Krishna Agarwal in 'Niyat' seventh in the country | ‘नीट’मध्ये नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा

‘नीट’मध्ये नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा

googlenewsNext

नांदेड : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रमाणपत्र परीक्षेत (नीट) नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे़
नीटसाठी देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ यात ७२० पैकी ६८५ गुण मिळवित नांदेडच्या कृष्णाने घवघवीत यश मिळविले़ कृष्णाचे आईवडील दोघेही डॉक्टर आहेत़ वडील बालरोगतज्ज्ञ तर आई दंतरोगतज्ज्ञ आहे. कृष्णाचे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण नांदेड येथीलच ज्ञानमाता विद्यालयात तर ११, १२ वी चे वेदांत महाविद्यालयात झाले़ पाचवीपासूनच त्याचा नियोजनबद्ध अभ्यास घेतला़ त्यामुळे हे यश अपेक्षितच होते़ महाराष्ट्रात अव्वल तर देशात पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये तो असेल असा विश्वास होता़ आज जाहीर झालेल्या निकालाने हा विश्वास सार्थकी लागल्याचे सांगत या यशाचे श्रेय वडिलांनी नांदेड येथील त्याच्या शिक्षकांना दिले़ नांदेडची टीम चांगली आहे़ त्यामुळे कृष्णाचे बेसिक फाऊंडेशन मजबूत झाले़ गणेश चौगुले, भार्गव राजे, रमाकांत जोशी, व्ही़डीक़ोनाळे, एक़े़सिंग आदी शिक्षकांकडे आम्ही कृष्णाला सोपविले होते़ निकालात या शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत नीटसाठीचा अभ्यास करताना आम्ही आमचे डोके लावले नाही़ त्याचे शिक्षक सांगतील तेवढा आणि तसाच अभ्यास कृष्णाकडून करुन घेतल्याचेही डॉ़ आशिष अग्रवाल यांनी नमूद केले़ वैद्यकीय अभ्यासक्रमाची ४ वर्षे आहेत़ या कालावधीत पुढे काय करायचे याचा निर्णय कृष्णाच त्याच्या आवडीनुसार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़

---
एम्समध्ये प्रवेशासाठी उत्सुक
कृष्णा अग्रवाल एम्स वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहे़ एम्सचा निकाल १८ तारखेला लागणार आहे़ एम्समध्ये प्रवेश मिळेलच अन्यथा ‘मौलाना आझाद’चा पर्याय असल्याचे कृष्णा याने सांगितले़

Web Title: Nanded Krishna Agarwal in 'Niyat' seventh in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.