शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: लोहा तालुक्यात पावसाचा हाहाकार; उमरा गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:16 IST

तालुक्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून कुटुंबांना स्थलांतर करावे लागत आहे.

- गोविंद कदमलोहा : तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू असून सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील उमरा गावात पाणी शिरल्यामुळे सात ते आठ कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत तसेच गावातील काही घरांमध्ये आसरा देण्यात आला आहे. याबाबतची माहिती गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी व जिल्हा परिषद उपअभियंता शिवाजी राठोड यांनी दिली आहे.

लिंबोटी धरणाचे तब्बल १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रासह परिसरातील गावांमध्ये पाणी वाढले असून अनेक ठिकाणी धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, हळद यांसारख्या पिकांवर पावसाचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे हातचे पीक पाण्यात बुडाले आहे. इतकेच नव्हे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून कुटुंबांना स्थलांतर करावे लागत आहे.

दरम्यान, लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी तसेच आपत्ती व्यवस्थापनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा कमी पडू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून उमरा येथे तातडीने आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले आहे. सततचा पाऊस, धरणांमधील विसर्ग आणि नदीपात्रातील वाढते पाणी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NandedनांदेडfloodपूरRainपाऊस