शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन कक्षाचे टाळे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:49 IST

डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनच्या कक्षाला गेल्या तीन महिन्यांपासून टाळे ठोकण्यात आले होते़ अंतर्गत वादात दुरुस्तीअभावी ही मशीन बंदच होती़

ठळक मुद्देगरीब रुग्णांना मिळाला दिलासालोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तातडीने कंपनीशी संपर्क साधला़

नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनच्या कक्षाला गेल्या तीन महिन्यांपासून टाळे ठोकण्यात आले होते़ अंतर्गत वादात दुरुस्तीअभावी ही मशीन बंदच होती़ त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तातडीने पावले उचलत या मशीनची दुरुस्ती करण्यात आली असून रुग्णांची तपासणीही करण्यात आली़डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण होण्यापूर्वीच काही महिने अगोदर कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्यात आली होती़ परंतु रुग्णालयात जुनी मशीन असल्यामुळे नवीन मशीन अनेक महिने कार्यान्वितच करण्यात आली नाही़ रुग्णालय व महाविद्यालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण झाल्यानंतर या ठिकाणी नवीन मशीनवरील धूळ झटकण्यात आली़ परंतु तोपर्यंत बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेले होते़ या ठिकाणी ही मशीन सुरु कमी अन् बंदच जास्त दिवस राहत होती़ मशीनची देखभाल आणि दुरुस्ती करणारी कंपनी आणि महाविद्यालय प्रशासन यामध्ये दुरुस्तीच्या खर्चावरुन मतभेद झाले होते़ त्याचा फटका मात्र गरीब रुग्णांना बसत होता़याच कारणामुळे सप्टेंबर महिन्यापासून ही मशीन बंद होती़ त्यामुळे रुग्णांना हजारो रुपये खर्च करुन बाहेरुन ही तपासणी करावी लागत होती़ त्यात अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना सिटी स्कॅन तपासणीसाठी विष्णूपुरी येथून पुन्हा शहरात आणणे जिकरीचे होते़ परंतु या प्रकाराबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी फारसे गंभीर नसल्याचाच आजपर्यंतचा अनुभव आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तातडीने कंपनीशी संपर्क साधला़ त्यानंतर या मशीनची दुरुस्ती करण्यात आली़

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल