शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नांदेडमध्ये शेतकºयांची पीक कर्जाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:58 IST

नांदेड : कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ त्यामुळे यंदा बहुतांश शेतकºयांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरविली असून आहे ते कर्ज कायम ठेवल्याचे खरीप आणि रबी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाच्या आकडेवारीवरून दिसते़ यंदा खरिपासाठी केवळ ९१ हजार १०९ शेतकºयांनी ४२३़६७ कोटी रूपयांचे पीक कर्ज घेतले आहे़ तर रबीसाठी आजपर्यंत केवळ २ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे़

ठळक मुद्देखरिपात केवळ २८ टक्के पीक कर्ज वाटप : रबी हंगामासाठी आजपर्यंत ९ कोटींचे वाटप

श्रीनिवास भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ त्यामुळे यंदा बहुतांश शेतकºयांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरविली असून आहे ते कर्ज कायम ठेवल्याचे खरीप आणि रबी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाच्या आकडेवारीवरून दिसते़ यंदा खरिपासाठी केवळ ९१ हजार १०९ शेतकºयांनी ४२३़६७ कोटी रूपयांचे पीक कर्ज घेतले आहे़ तर रबीसाठी आजपर्यंत केवळ २ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे़छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला़ यामध्ये लावलेल्या नियम व अटींमुळे आजपर्यंत प्रत्यक्षात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला याची माहिती जिल्हा प्रशासनासह, बँक अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कोणाकडेही आकडेवारी उपलब्ध नाही़ केवळ आॅनलाईन अर्ज केलेल्या आणि ग्रीन लिस्टमध्ये असलेल्या शेतकºयांची संख्या प्रत्येकाकडून सांगितली जात आहे़दरम्यान, कर्जाची नियमित परतफेड करणाºया लाखो शेतकºयांना कर्जमाफीतून वगळण्यात आले़ या नियमामुळे जिल्ह्यातील ६ हजार ८१० चालू बाकीदार, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाºया शेतकºयांना सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़ तसेच त्यांना दिले जाणारे प्रोत्साहन अनुदानही आजपर्यंत मिळालेले नाही़ त्यामुळे कर्जमाफीचा गोंधळ आजपर्यंत तरी संपलेला नाही़कर्जमाफीनंतर बहुतांश शेतकºयांनी पीक कर्जाकडे पाठ फिरविली़ मागील वर्षात खरीप हंगामामध्ये ९२ टक्के कर्जवाटप झाले होते़ यंदा केवळ २८ टक्के वाटप झाले आहे़ खरिपासाठी १५२६़२५ कोटी रूपये उद्दिष्ट असताना ९१ हजार १०९ शेतकºयांना केवळ ३२३़६७ कोटी पीक कर्ज वाटप करण्यात आले़ तर रबीची टक्केवारी केवळ २ असून आजपर्यंत ८०४ शेतकºयांनी ८़९९ कोटी रूपये पीक कर्ज घेतले आहे़ रबीसाठी यंदा ३९९़४ कोटी रूपयांचे उद्दिष्ट आहे़जिल्ह्यात २६ राष्ट्रीयीकृत, १ महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक अशा एकूण २८ बँकाच्या विविध शाखांमधून पीक कर्ज वाटप केले जात आहे़ आजपर्यंत रबी हंगामासाठी वाटप केलेले पीक कर्ज पुढीलप्रमाणे- (उद्दिष्ट आणि वाटप) बँक आॅफ बरोदा (५ कोटी ३३ लाख- वाटप २८ लाख), देना बँक - ( २३ कोटी ४८ लाख - वाटप ५६ लाख), बँक आॅफ इंडिया (१७ कोटी ६९ लाख - वाटप १० लाख), एचडीएफसी बँक (५ कोटी २९ लाख - वाटप ४ कोटी ६२ लाख), आयसीआयसीआय बँक (३ कोटी ११ लाख - वाटप १ कोटी ६७ लाख), महाराष्ट्र ग्रामीण बँक ( ६८ कोटी २३ लाख - वाटप १ कोटी ७५ लाख) पीककर्ज वाटप केले आहे़युनायटेड कमर्शियल बँक, युनियन बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, आंध्र बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, ओरिएन्टल बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओहरसेझ बँक, विजया बँक, करूर वैश्य बँक, कर्नाटका बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, डीसीबी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी आजपर्यंत रबीसाठी एक रूपयाचेदेखील पीक कर्ज वाटप केले नाही़ यंदाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ आहे़ आॅक्टोबरपासून रबीसाठी पीक कर्ज वाटप सुरू आहे़ तर खरिपासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत केवळ २८ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे़