शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नांदेड लोकसभेसाठी कोट्यधीशांमध्ये चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:29 AM

नांदेड लोकसभेसाठी दोन प्रमुख कोट्यधीश उमेदवारांमध्ये लढत होणार असून तिसरा उमेदवारही लखपती असल्याचे निवडणूक अर्ज सादर करताना दिलेल्या विवरणपत्रातून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण, चिखलीकर, भिंगे यांच्यावर लाखोंचे कर्जही

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी दोन प्रमुख कोट्यधीश उमेदवारांमध्ये लढत होणार असून तिसरा उमेदवारही लखपती असल्याचे निवडणूक अर्ज सादर करताना दिलेल्या विवरणपत्रातून स्पष्ट होत आहे.नांदेड लोकसभेसाठी ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण, भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. यशपाल भिंगे हे रिंगणात उतरले आहेत. या प्रमुख उमेदवारांपैकी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्याकडे २३ कोटी २९ लाख ८६ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यात आजघडीला चव्हाण यांच्याकडे ४ लाख ८३ हजार ४६५ रुपये रोख आहेत. त्यांच्या सौभाग्यवती अमिता चव्हाण यांच्याकडे १ लाख ९१ हजार २०० रुपये रोख स्वरुपात उपलब्ध आहेत. चव्हाण यांच्या विविध बँक खाते, ठेवी, शेअर्स, बचत रक्कम आदींचा आकडा हा २ कोटी ५८ लाख ६३ हजार ७९० रुपये किमतीचा आहे. त्यात सोने, चांदी, हिऱ्यांचाही समावेश आहे. सोन्या-चांदीची किंमत २२ लाख ७९ हजार २६१ तर हिऱ्यांची किंमत २६ लाख ६० हजार ७९ रुपये इतकी आहे.जमीन, शेती आदी मालमत्ताही चव्हाण यांच्याकडे उपलब्ध असून याची किंमत २० कोटी ६६ लाख ३९ हजार २४० रुपये दर्शविण्यात आली आहे. त्याचवेळी अशोकराव चव्हाण यांच्यावर २ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांचे कर्जही असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे कोट्यधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८ कोटी ५३ लाख ६३ हजार ८२५ रुपये इतक्या किमतीची आहे. त्यात प्रतापराव यांच्याकडे रोख २२ लाख ४३ हजार ५८६ रूपये आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाबाई चिखलीकर यांच्याकडे २ लाख ३० हजार रुपयांची रोकड आहे. चिखलीकरांकडे ११ तोळे सोने असून त्याची किंमत ३ लाख ५२ हजार रुपये आहे. तर १५ लाख ६ हजार ६२ रुपयांच्या विविध ठेवीही आहेत. १६ हजार ८३५ रुपयांची गुंतवणूकही त्यांनी शेअर्स आदी माध्यमांतून केली आहे. विमा, बचत खाते आदींच्या माध्यमातून ३० लाख ७० हजार ९५२ रुपये त्यांनी गुंतवले आहेत. जवळपास ७२ लाख ५९ हजार रुपये किमतीची त्यांची एकूण संपत्ती आहे. चिखलीकरांकडे शेतजमीन तसेच वारसाप्रमाणे मालमत्ता उपलब्ध आहे. या मालमत्ताची किंमत ३० लाख रुपये दर्शविण्यात आली आहे. जमीन, निवासी इमारती आदी १ कोटी ३५ लाखांची मालमत्ताही चिखलीकर यांच्याकडे उपलब्ध आहे. चिखलीकर यांच्यावर ५ लाख ९४ हजार रुपयांचे कर्ज आहे.नांदेड लोकसभा निवडणुकीतील तिसरे प्रमुख उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे हे लखपती असून त्यांच्याकडे ६९ लाख ८१ हजार रुपयांची एकूण संपत्ती आहे. भिंगे यांच्याकडे ३ लाख रुपये रोख आहेत. तर बँक खात्यात ३ लाख ५३ हजार ३५९ रुपये उपलब्ध आहेत.तर वाहनांची किंमत ११ लाख ७४ हजार ६७६ रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे दोन तोळे सोने उपलब्ध असून ६० हजार रुपये किंमत दर्शविण्यात आली आहे. भिंगे यांच्या इतर मालमत्तांमध्ये निवासी इमारतीची किंमत ५० लाख २० हजार रुपये इतकी आहे. भिंगे यांच्यावर २० लाख ५० हजार रुपयांचे कर्जही आहे. 

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाण