शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

राज्यापेक्षा नांदेड जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 19:05 IST

अनेक खाजगी अन् शासकीय कोविड सेंटर गुंडाळले

ठळक मुद्देकोरोनाची रुग्णसंख्या झाली कमी मृत्यूदरातही झाली घट

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, मृत्यूदरात मात्र अपेक्षित घट झाल्याचे दिसून येत नाही. राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के असून जिल्ह्याचा मृत्यूदर मात्र २.८४ टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर यापूर्वी तब्बल पाच टक्क्यांवर पोहोचला होता. त्यावेळी मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यू दर नांदेडचा होता. 

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या आता शंभरपेक्षा कमी झाली आहे. दररोज साधारणता पन्नास ते साठ रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अनेक खाजगी आणि शासकीय कोविड केअर सेंटर गुंडाळले आहेत. मृत्यू पावणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत असले तरी, अपेक्षित प्रमाणात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले नाही. सध्या मृत्यू पावणाऱ्यांमध्ये इतर व्याधीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.  

पन्नाशीपुढील मृत्यू पावणारे अधिकनांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पन्नाशीपुढील अधिक रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर तिशीतील काही जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पन्नाशीपुढील रुग्णांची संख्या जवळपास तीनशेहून अधिक आहे. तर साठी आणि सत्तरीच्या पुढील शंभराहुन अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. साधारणता कोरोनाचा संसर्ग आणि इतर व्याधी असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यू पावणारे यांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही शरीरातील ऑक्सिजनस्तर अचानक कमी होणे आणि फुफ्फुसात संसर्ग वाढणे. यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेक रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवावे लागले. आरोग्य विभागानेही या अनुषंगाने व्हेंटीलेटरची संख्या वाढविली आहे. त्या मानाने विशीतील तरुण आणि लहान मुले यांना मात्र कोरोनाचा धोका कमी असल्याचेच दिसून आले. 

अनेकांनी गुंडाळला गाशाजिल्ह्यात जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. दररोज साधारणता तीनशेहून अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील खाटा अपुर्या पडत होत्या. त्यातच खाजगी कोविड सेंटरमध्येही खाटा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे रुग्णांना खाटेसाठी वशिला लावण्याची वेळ येत होती. आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे अनेक कोविड सेंटरने आपला गाशा गुंडाळला आहे. 

गाफील राहून चालणार नाही- डॅा.भोसीकरजिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. गेल्या सात महिन्यांच्या काळात दिवसरात्र डाॅक्टर, कर्मचारी, परिचारिका यांनी न थकता आपली सेवा बजाविली. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचवू शकलो. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी, गाफील राहून चालणार नाही. जगात काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबत दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आहे. मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन या बाबींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आरोग्य यंत्रणा सक्षम असून इंजेक्शन, खाटा यासह सर्व सुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॅा.नीळकंठ भोसीकर यांनी दिली. 

जिल्ह्याची परिस्थितीबरे झालेले - 17822, उपचार चालू - 600,  बळी - 507नांदेड 2.84%, मृत्यूदर डबलिंगचा रेट - दिवस 60पॉझिटिव्हीटी रेट - 3.31%, कोरोनामुक्ती रेट - 96.74%

टॅग्स :Nandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू