शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

नांदेड जिल्ह्यातील १२४ शिक्षक अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:15 IST

शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रकियेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते़ यानंतर काही शिक्षकांना पुन्हा बदली आदेश देण्यात आले तर ६८७ शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदवीधरांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना देण्यात आली आहे़ तरीदेखील आजघडीला १२४ शिक्षक विस्थापितच आहेत़

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पदवीधरांच्या जागी विस्थापितांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रकियेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते़ यानंतर काही शिक्षकांना पुन्हा बदली आदेश देण्यात आले तर ६८७ शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदवीधरांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना देण्यात आली आहे़ तरीदेखील आजघडीला १२४ शिक्षक विस्थापितच आहेत़पहिल्यांदाच शिक्षक बदली प्रकियेसाठी आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला़ दरम्यान, पहिल्या टप्प्यात जवळपास ४ हजार ५८ शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली करण्यात आली़ या प्रक्रियेबाबत बहुतांश शिक्षकांनी समाधान व्यक्त केले़ परंतु, नांदेडात सर्वाधिक १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते़ त्यापैकी ३८७ शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यात बदली आदेश देवून गाव देण्यात आले़परंतु, जिल्ह्यातील रिक्त जागा संपल्याने उर्वरित सातशेवर शिक्षकांचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता़ मात्र, एनआयसी आणि जि.प. प्रशासनाने समन्वय साधून जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागी जवळपास ६८७ टक्के शिक्षकांची नेमणूक करण्यात आली़ त्यानंतरदेखील १२४ विस्थापित राहिले असून त्यांना अद्यापपर्यंत गाव मिळालेले नाही़ विस्थापित शिक्षकांमध्ये ज्युनिअर शिक्षकांची संख्या अधिक आहे़ तर अगोदर बदल्या झालेल्या शिक्षकांमध्ये सिनिअर शिक्षक अधिक आहेत़ खो पद्धतीने झालेल्या बदल्यांमुळे अनेक ज्युनिअर शिक्षकांना खो बसून ते जिल्ह्याच्या शेवटचे टोक असलेल्या गावात फेकल्या गेले़ तर दुसºया टप्प्यात अनेक महिला शिक्षकांना नांदेड तसेच मोठ्या शहरापासून कोसोदूर असणाºया वाडी-तांड्यावर आणि दुर्गम भागातील शाळा मिळाल्या आहेत़ तर पदवीधरच्या जागी विस्थापितांना संधी दिल्याने अनेकजण रोष व्यक्त करीत आहेत.---‘इब्टा’चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदनजिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर शिक्षक, पदोन्नत मुख्याध्यापक शिक्षकांच्या संवर्ग १ ते ४ मधील बदल्यात अनेकांनी बोगस प्रमाणपत्रांचा आधार घेतला. या प्रमाणपत्रांची विशेष पडताळणी समितीच्या मार्फत चौकशी करुन सर्व दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन(इब्टा) ने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर इब्टाचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, रमेश गोवंदे, बालाजी थोटवे, विजयकुमार गजभारे, ग.ई. कांबळे, बबन घोडगे, नागनाथ यरमलवाड, मिलिंद राऊत, उद्धव मुंगरे, माधव कांबळे, रामदास वाघमारे, गणपत गायकवाड, शेख नसीर, राम अनंतवार, प्रकाश चांडोळकर, निलेश गोधने आदींच्या स्वाक्षºया आहेत.---विस्थापित शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावणार-राठोडनांदेड : शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणात अनियमिततेबाबत विस्थापित कृती समितीच्या वतीने १७ जून रोजी आ. तुषार राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विस्थापित शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आ. राठोड यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी धनंजय पोतदार, रमेश भुमलवाड, कोशटवाड, चारवाडीकर, उत्तम शिंदे, आनंद नागरगोजे, बळीराम धुमाळे, नंदकुमार स्वामी, कोटलवार, डी.डी. जाधव, दत्ता खंकरे आदी विस्थापित शिक्षकांची उपस्थिती होती.---अन्यायग्रस्त शिक्षकांची आज बैठकनांदेड : शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या अन्यायग्रस्त शिक्षकांची जिल्हा परिषदेतील प्रांगणात १९ जून रोजी दुपारी ४ वाजता बैठक होणार आहे. यावेळी बैठकीत जिल्ह्यातील सर्व बदली अन्यायग्रस्तांनी आॅनलाईन भरणा केलेल्या फॉर्मची प्रत, पती-पत्नी एकत्रिकरणामध्ये सेवेत असल्याबाबतचे प्रमाणपत्र, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले शिक्षक, तसेच ज्यांनी विनंती अर्ज भरला पण त्यांची बदली झाली नसलेले शिक्षकांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदTeacherशिक्षकTeachers Councilशिक्षक परिषदTransferबदली