शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

नांदेड जिल्ह्यात अवकाळीने पळविला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:28 IST

फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़

ठळक मुद्देशेकडो हेक्टरला फटका : केळीच्या बागा झाल्या आडव्या, हळदीचा रंगही पडला फिका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार,रविवारी नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले़ वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांत पाऊस झाला़ नांदेड शहर व परिसरात तासभर झालेल्या पावसाने शहरातील नाल्या ओहरफ्लो होवून सर्वत्र रस्त्यांनी पाणीच पाणी झाले होते़ तर होर्डिंग्ज आणि दुकानांसमोरील बॅनर वा-याने रस्त्यावर येवून पडले होते़ तर ग्रामीण भागात आंबा, केळी, चिकू, ऊस आदी पिकांसह अनेक ठिकाणच्या शेतातील झोपड्या वादळी वाºयाने जमीनदोस्त केल्या़ घरावरील पत्रे उडूनही नुकसान झाल्याच्या घटना नांदेड तालुक्यातील तळणी, धानोरा परिसरात घडल्या़ वाºयाचा जोर प्रचंड असल्याने झाडांच्या फांद्या पडून महावितरणचे मोठे नुकसान झाले़इसापूर धरणाचे पाणी न मिळाल्याने अर्धापूर तालुक्यातील बहुतांश शेतकºयांनी आपल्या केळीच्या बागा तोडून काढल्या होत्या़ त्यातच काही शेतकºयांनी उपलब्ध पाण्यामध्ये ठिबक तसेच जिवाचे रान करून आपल्या केळी बागा जगविल्या आहेत़ केळीचे घड नुकतेच भरत असताना वादळी वाºयाने कहर केला़ यात बहुतांश ठिकाणच्या बागांना फटका बसला असून उभ्या केळी आडव्या झाल्या आहेत़ तसेच हळद वाळून ती ढोल करायला (पॉलिश) आली असता अवकाळीने गाठले़ हळद भिजल्याने कोट्यवधी रूपयांचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ साडेआठ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळणारा भाव हळद भिजल्याने निम्मादेखील मिळणार नाही़नांदेड तालुक्यातील राहाटी, तळणी, धानोरा आदी परिसरातील आंब्यासह संत्रा, मोसंबी, केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे़ वाºयाच्या जोराने उभा ऊसदेखील आडवा झाला आहे़ तालुक्यात अंदाजे २०० हेक्टर बागायती आणि ५० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली़ मंगळवारपासून प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरूवात होईल़ यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल, असेही अंबेकर यांनी सांगितले़ पाऊस अन् गारांमुळे पार्डी परिसरातील निमगाव देळूब, कारवाडी, चोरंबा, शेणी भागातील केळी, ज्वारी, टरबूज, हळद, आंब्यासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले़ सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली़ झाडे उन्मळून पडली़ निमगाव येथे केळीचे नुकसान झाले असून हातात आलेले केळीची बाग गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत़कर्नाटकला जाणारी डाळही भिजलीमाहूर तालुक्यातील वाई बाजारसह परिसरात वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला़ यामध्ये वाई परिसरातील वादळी वाºयासह पावसाने परिसरातील बागायतीचे पिकांचे नुकसान झाले़ तसेच जय योगेश्वर अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (दालमिल)मधील हजारो क्विंटल तूरडाळ भिजली़दालमिलचे टिनशेड जमिनीच्या दिशेने झुकल्याने शेडमध्ये असलेली १२६०० पोती तूरडाळ पावसाने भिजून खराब झाली़ ही डाळ कर्नाटक सरकारला पुरवठा करायची होती. सदर पोत्यामध्ये १ किलो वजनी असलेले २५ पॉकीट होते़ तसेच या शेडच्या परिसरात ३९० किलो मोकळी तूरडाळ व ३० क्विंटल हरभºयाचेही नुकसान झाले़ यात मोठे नुकसान झाल्याचे इंडस्ट्रीजचे मालक अतीश गेंटलवार यांनी सांगितले़महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक व्ही़एमग़ड्डमवार, अव्वल कारकून एस़पी़जुकंटवार, संतोष पवार, तलाठी काळे यांनी पंचनामा केला़फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीत २०० कोटींचे अनुदान वाटपफेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीने लिंबगाव परिसरातील फळबागांसह उन्हाळी ज्वारीचे मोठे नुकसान झाले होते़ दरम्यान, शासनाच्या वतीने दीड ते दोन महिन्यांतच नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत दिली़ पिकानुसार शेतकºयांना अनुदान देण्यात आले़ नांदेड तालुक्यात जवळपास २०० कोटी रूपयांचे अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात आले़ अवकाळीने वाई बाजार येथील अ‍ॅग्रो इंडस्ट्रीचे नुकसान झाले आहे़नांदेड उत्तरमध्ये नुकसानीची आ. डी. पी. सावंत यांनी पाहणी करून शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली़ नाळेश्वर, राहाटी व ढोकी गावांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ आ़सावंत यांनी भेट देवून शेतकºयांशी संवाद साधला़ यावेळी सभापती सुखदेव जाधव, साहेबराव धनगे, दीपक पाटील, नरहरी वाघ, माधवराव वाघ, रंगनाथ वाघ, बबन वाघमारे, अतुल वाघ आदी उपस्थित होते़

टॅग्स :RainपाऊसHailstormगारपीटfruitsफळे