शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट परिक्षार्थी प्रकरणातील पाच जणांचा जामीन नांदेड जिल्हा न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:44 IST

बनावट परिक्षार्थी प्रकरणामध्ये शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या पाच जणांचा नांदेडचे सातवे जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जामीन फेटाळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : बनावट परिक्षार्थी प्रकरणामध्ये शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या पाच जणांचा नांदेडचे सातवे जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जामीन फेटाळला आहे.बनावट परिक्षार्थी बनून पात्रता नाही अशा व्यक्तीला ती परीक्षा पास करुन त्या निर्णयावर नोकरीला लागलेल्या पंधरा जणांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले होते. त्यात शासकीय निवासी शाळा उमरी येथील सेवक शिवलाल वामन जाधव (३१), शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे कार्यरत कनिष्ठ लिपिक विठ्ठल नारायण कोकुलवार (२९), आंबेडकर मुलींचे वसतिगृह गोंदिया येथे गृहपाल असलेला अंकुश प्रल्हाद राठोड (३१), नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य शाखेत लिपिक असलेला अमोल गणपत दासरवार (३१) आणि संसदीय कार्य मंत्रालय मुंबईमध्ये कार्यरत लिपिक साहेबराव भिकू चव्हाण (३१) यांनी अटक झाल्यानंतर नांदेडच्या जिल्हा न्यायालयात जामीन मिळावी यासाठी अर्ज केला होता.या प्रकरणी पोलीस अधीक्षक शंकर केंगार आणि पोलीस उपअधीक्षक आर.एम.स्वामी यांनी न्यायालयात सविस्तरपणे या प्रकरणाचा प्रगती अहवाल सादर केला. सरकारी वकील अ‍ॅड. अधार्पूरकर यांनी प्रकरणातील आरोपींना जामीन देवू नये, अद्याप बऱ्याच बाबी तपासात शिल्लक आहेत आणि हे आरोपी जामिनीवर सुटले तर साक्षीदारांवर दबाब आणू शकतील असा मुद्दा मांडला. युक्तीवाद ऐकून न्या. मांडे यांनी बºयाच आरोपींचे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविले असून त्याचा अहवाल प्राप्त होणे शिल्लक आहे. गुन्ह्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपींना जामीन देणे योग्य नाही, अशी नोंद करुन या पाच जणांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.दरम्यान, या प्रकरणातील मुंजा गिरी, अमोल श्रीमनवार, अक्षय राठोड, नरेश पवार, मनोज जाधव आणि जगदीश राठोड यांच्यासह काही जणांचे जामीन अर्ज सुनावणीसाठी प्रलंबित असून पुढील सुनावणी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत चार दोषारोपपत्र दाखल केले असून पाचवे दोषारोपपत्र लवकरच दाखल होणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयStudentविद्यार्थी