शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:51 IST

राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण रोजगारवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार

नांदेड : राज्यात गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूक नाही, कारखाने नाहीत, रोजगार नाही़ गेल्या ४५ वर्षांत जेवढी नाही तेवढी यावेळी बेरोजगारी वाढली आहे़ भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला असून काँग्रेसची सत्ता आल्यास नांदेडातच रोजगार निर्माण करण्यात येईल़ नांदेडच्या तरुणांना बाहेर जाण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोंढार येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नसीम खान, आ़डी़पी़सावंत यांची उपस्थिती होती़ चव्हाण म्हणाले, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जाळले जात असताना भाजपा सरकार मात्र गप्प बसले होते़ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जनहितकारी निर्णय घेतात़ मात्र भाजप सरकार तेच घेतलेले निर्णय पुन्हा न्यायालयाकडे पुनर्विचारासाठी पाठविते़ देशात अशाप्रकारे हुकूमशाही कारभार सुरु असल्याचा घणाघात खा़अशोकराव चव्हाण यांनी केला़कॉग्रेस पक्ष स्वायत्त, संविधानिक संस्थांना स्वतंत्रता देणारा पक्ष आहे़ तर भाजप, आरएसएस संविधान मानत नाहीत़ विचार थोपविण्याचे तसेच प्रत्येक संस्थेवर आरएसएसच्या व्यक्तीचा सहभाग ठेवणे हेच एकमेव काम सुरु आहे़ असेही ते म्हणाले़ तर हॉटेल सिटी प्राईडमध्ये बुद्धिजीवी वर्गाची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत चव्हाण म्हणाले, भाजपाने देशातील व्यापाऱ्यांना चोर ठरविले आहे़ जीएसटी, नोटाबंदी करुन वाताहत केली आहे़ देशात प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे़ परंतु पंतप्रधानांनी चार्टर्ड अकाऊंटन्ट यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून दम दिला, असेही ते म्हणाले़ यावेळी अ‍ॅड़विजय भोपी, अ‍ॅड़सिद्दीकी, जयप्रकाश फलोर, गुणाल मालपाणी, अ‍ॅड़भोसले, अ‍ॅड़हांडे, रहेमान सिद्दीकी, गोविंद मुंदडा यांची उपस्थिती होती़शीख बांधवांशी साधला संवाद- गुरुद्वारा गेट क्रमांक ५ येथे अशोकराव चव्हाण यांनी शीख बांधवांशी संवाद साधला़ गुरुद्वारामुळेच नांदेडची ओळख असून भाजपाच्या काळात धर्मामध्ये ढवळाढवळ करण्यात येत आहे़ काँग्रेसने अशी ढवळाढवळ कधीही केली नाही़ परंतु भाजपच्या काळात मात्र सरकार गुरुद्वाराच्या प्रबंधनाचा चेअरमन ठरवित आहे़ कारण पंतप्रधानांना त्या जागी आरएसएस-भाजपाचा व्यक्ती पाहिजे़ पीएमच्या ‘मन की बात नसून दिल की बात’ ची गरज आहे़ भाजप सरकार देश आणि राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे़ कोणी काय खायचं, काय बोलायचं, कोणते कपडे घालायचे हे सरकारच ठरवित आहे़ विचार थोपवून सर्वसामान्यांवर अन्याय करणा-या सरकारला खाली खेचा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले़ यावेळी विरेंद्रसिंघ गाडीवाले, नरेंद्र चव्हाण, रवींद्रसिंघ बुंगई, डिम्पल नवाब, प्रकाशकौर खालसा, रणजितसिंघ कामठेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस