पार्डी : शेणी येथील ज्येष्ठ नागरिक व एसटी महामंडळातील निवृत्त आगारप्रमुख उमाजी राजाराम शिंदे (६७ ) यांचे १८ एप्रिल रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राजाबाई माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक नारायणराव शिंदे व पार्डी (म) येथील ग्रामसेवक राम शिंदे यांचे वडील होत.
माधव कुडके
बिलोली : साठेनगर येथील माधव मरिबा कुडके (४६) यांचे १९ एप्रिल रोजी सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.
जी. डी. कदम
नांदेड : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी जी. डी. कदम (७०) यांचे सोमवारी खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लिंबगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
बालाजी कडमपल्ले
नांदेड : बामसेफ युनिट नांदेडच्या एसटी प्रवर्गाचे जिल्हाध्यक्ष तथा पदोन्नत मुख्याध्यापक (जि. प. प्रा. शाळा सलगरा (बु.) ता. मुखेड) बालाजी रामजी कडमपल्ले यांचे १८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी पेठवडज, ता. कंधार येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुली, जावई, पुतण्या असा परिवार आहे.
नीलाबाई कावडे
नांदेड : सिडको वसाहतीतील नीलाबाई जनार्दनराव कावडे (६५) यांचे अल्पशा आजाराने १८ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. अंगणवाडी सेविका अंजली कावडे-निमडगे व सामाजिक कार्यकर्ते राचप्पा कावडे यांच्या त्या मातोश्री होत.