-नितेश बनसोडेमाहूर (जि. नांदेड) : सारखणी (ता. किनवट) येथील एका इसमाने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक सुखाची मागणी केल्याच्या प्रकरणी सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून १ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.
पिडीतेने २७ जुलै रोजी सिंदखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सरफराज खान नौशाद खान (वय २७, व्यवसाय – मजुरी, रा. सारखणी) याने मैत्रीच्या नात्यातून ओळख वाढवून तिचे काही फोटो काढले. नंतर हेच फोटो दाखवून आणि मोबाईलवर पाठवून पिडीतेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर वारंवार तिचा पाठलाग करून शरीरसुखाची मागणी केली. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या तक्रारीनुसार आरोपीवर गु.र.नं. 115/2025 अंतर्गत भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 64(1), 75(2)(3), 78, 79, 351(2)(3) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास माहूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश कराड करीत असून, सिंदखेडचे पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांचाही तपासात सहभाग आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता, त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.