शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Nanded Crime: नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार, पोलिसावर तलवारीने हल्ला; आरोपीवर पोलिसांनी झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 21:03 IST

मंगळवारी नांदेडात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

नांदेड- नांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हदरले आहे. व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण हद्दीत आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पाेलिसांच्या पथकावर आरोपीने तलवारीने हल्ला केला. त्यामुळे बचावासाठी पोलिसांनी आरोपीच्या मांडीवर गोळी झाडली. उपचारासाठी त्या आरोपीला रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेड हादरले आहे. मंगळवारी नांदेडात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेनंतर नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्यांच्यावर देशी कट्टयांचे गुन्हे आहेत, त्यांची झाडाझडती सुरु आहे. त्यातच नांदेड ग्रामीणचे पोनि.अशोक घोरबांड हे पथकासह वसरणी भागात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गुन्हेगार संजूसिंह बावरी हा साईबाबा मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथक त्याच्याकडे गेले असता, त्याने माझ्याकडे कशाला आले असे म्हणून शिवा पाटील या कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला केला. यात पाटील हे जखमी झाले. इतरही कर्मचाऱ्यांच्या अंगावर तो तलवार घेवून धावत होता. यावेळी पोनि.घोरबांड यांनी त्यांच्या मांडीवर गोळी घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपी बावरी आणि कर्मचारी पाटील या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बनावट पिस्टल घेवून स्टेटस पडले महागातशहरात अनेक तरुणांनी हातात देशी कट्टे, खंजर घेवून आम्ही याच भागातील डॉन आहोत, अशा प्रकारचे स्टेटस सोशल मिडीयावर ठेवले आहेत. सायबर सेलकडून त्यांच्या लक्ष ठेवण्यात येत आहे. भाग्यनगर हद्दीत पूयणी येथील चांदू पावडे यानेही बनावट पिस्टल हातात घेवून सोशल मिडीयावर स्टेटस ठेवले होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती पोनि.सुधाकर आडे यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी