हदगाव (जि. नांदेड): नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बामणी गावातून बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शुल्लक वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यालाच पेटत्या दुचाकीवर ढकलून दिले. या भीषण घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान रविवारी (दि. ५) मृत्यू झाला असून, या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?२५ मार्च रोजी बामणी शिवारात हे कुटुंब शेतात हरभरा (चना) काढणीच्या कामात व्यस्त होते. दिवसभर आई-वडील, मुलगा आणि सून यांनी कष्ट केले. सायंकाळी मळणी यंत्र (थ्रेशर) येणार असल्याने वडिलांनी मुलाला शेतातच थांबण्यास सांगितले. मात्र, वडिलांचा शब्द डावलून मुलगा फाट्यावर गेला आणि दारू पिऊन परतला. यावेळी वडीलही दारूच्या नशेत असल्याने दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
दुचाकीचा राग जीवावर बेतलादोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या वडिलांनी शेतातील कचरा जमा करून मुलाची दुचाकी पेटवून दिली. आपली लाडकी दुचाकी डोळ्यादेखत जळताना पाहून मुलाचा संयम सुटला. त्याने विचार न करता आपल्या वडिलांनाच धगधगत्या दुचाकीवर ढकलून दिले. वडिलांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला आणि ते गंभीररीत्या भाजले गेले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दहा दिवस मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत रविवारी मालवली. आज शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संताप आणि व्यसनाधीनतेचा बळी"राग आणि भीक माग" या म्हणीचा प्रत्यय बामणीकरांना या निमित्ताने आला आहे. पोटचा मुलगा म्हातारपणी आधार होईल, या आशेने वाढवलेल्या पित्याचा अंत मुलाच्याच हाताने झाला. मनाठा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेने ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता आणि कौटुंबिक वादाचे विदारक वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
Web Summary : In Nanded, a son fatally pushed his father onto a burning motorcycle after the father torched it in anger. The father succumbed to his injuries after ten days. The incident highlights rising addiction and family disputes.
Web Summary : नांदेड़ में, पिता द्वारा बाइक जलाने पर बेटे ने गुस्से में आकर पिता को जलती हुई मोटरसाइकिल पर धक्का दे दिया, जिससे उनकी मौत हो गई। घटना बढ़ती व्यसन और पारिवारिक विवादों को उजागर करती है।