शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचे नाणे खणखणीत; कृष्णा अग्रवाल नीट परीक्षेत देशात सातवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 17:06 IST

नीट प्रवेशपूर्व  परिक्षेत नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे़.

ठळक मुद्देनीट परीक्षेत ७२० पैकी ६८५ गुण मिळवत नांदेडच्या कृष्णा अग्रवालने घवघवीत यश मिळविले़

नांदेड : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट या प्रवेशपूर्व  परिक्षेत नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे. इयत्ता ५ वी पासून नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कष्टामुळेच हे यश मिळाल्याची प्रतिक्रया कृष्णाचे वडील डॉ. आशिष अग्रवाल यांनी व्यक्त केली.

नीटसाठी देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती़ यात ७२० पैकी ६८५ गुण मिळवत नांदेडच्या कृष्णा अग्रवालने घवघवीत यश मिळविले़ कृष्णाचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत़ वडील बालरोग तज्ज्ञ तर आई दंतरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे़ त्याचे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण नांदेड येथीच ज्ञानमाता विद्यालयात तर ११, १२ वी चे वेदांत महाविद्यालयात झाले़ ५ वी पासूनच त्याचा नियोजनबद्ध अभ्यास घेतला़ त्यामुळे हे यश अपेक्षितच होते़ महाराष्ट्रात अव्वल तर देशात पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये तो असेल असा विश्वास होता. आज जाहिर झालेल्या निकालाने हा विश्वास सार्थकी लागल्याचे सांगत या यशाचे श्रेय त्यांनी नांदेड येथील त्याच्या शिक्षकांना दिले.

नांदेडची टिम चांगली आहे़ त्यामुळे कृष्णाचे बेसिक फाऊंडेशन मजबुत झाले़ गणेश चौगुले, भार्गव राजे, रमाकांत जोशी, व्ही़डीक़ोनाळे, एक़े़सिंग आदी शिक्षकांकडे आम्ही कृष्णाला सोपविले होते़ निकालात या शिक्षकांचा सिहांचा वाटा असल्याचे सांगत नीटसाठीचा अभ्यास करताना आम्ही आमचे डोके लावले नाही़ तर त्याचे शिक्षक सांगतिल तेवढा आणि तसा अभ्यास कृष्णाकडून करुन घेतल्याचेही डॉ.आशिष अग्रवाल यांनी नमुद केले़

एम्समध्ये प्रवेशासाठी उत्सुकनीट परिक्षेत देशात सातवा आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला कृष्णा अग्रवाल एम्स वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहे़एम्सचा निकाल १८ तारखेला लागणार आहे़ एम्समध्ये प्रवेश मिळेलच अन्यथा मौलाना आझादचा पर्याय असल्याचे कृष्णा अग्रवाल याने सांगितले़ दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमाची ४ वर्ष आहेत़ या ४ वर्षात पुढे काय करायचे याचा निर्णय कृष्णाच घेईल असे त्याचे वडील डॉ़आशिष अग्रवाल यांनी सांगितले़.

टॅग्स :NEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८Studentविद्यार्थीexamपरीक्षा