शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहराला आता दिवसाआड पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:49 IST

विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे नांदेड शहराला सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी प्रकल्पात जलसाठा वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे नांदेड शहराला सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे.नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात ४० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. हा साठा पुरेसा असल्याने शहराला २ ऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे आयुक्त माळी यांनी सांगितले.शहराला मागील दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. रमजान ईदपूर्वी दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र तांत्रिक बाबीमुळे दररोज पाणीपुरवठा करणे अथवा एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य नव्हते. पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक अडचणी दूर करताना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी पाणीपुरवठा कर्मचाºयांच्या संख्येत अल्पशी वाढ करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाने ८ वॉलमेन वाढवले आहेत तर पंप आॅपरेटरलाही गरजेनुसार हलवण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.---पाणी गळतीला घातला आळाशहराला एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हा निर्णय घेताना महापालिकेने जवळपास एक महिना तयारी केली आहे. शहरातील कोटीतीर्थ पंपहाऊस येथे चार ठिकाणाहून होणारी पाणीगळती थांबविली आहे तर काळेश्वर पंपहाऊसवरुन एका ठिकाणी आणि काबरानगर पंपहाऊसवरील एका ठिकाणची गळती थांबवण्यात आली आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू होती. कोटीतीर्थ पंपहाऊसवर मनपाने अतिरिक्त पंपही उपलब्ध करुन दिला आहे. महावितरणची साथ मिळाल्यास दिवसाआड पाणी मिळणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाWaterपाणीvishnupuri damविष्णुपुरी धरण