शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या नावाखाली नांदेडकरांचा छळ; नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:01 IST

प्रशासकराज' संपुष्टात आल्यावर तरी शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळेल का गती?

नांदेड : शहरात मागील दोन वर्षांपासून विकासकामांच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नांदेडकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'अमृत २.०' योजनेअंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा योजनेची कामे शहरात सुरू असली, तरी या कामांचा वेग अत्यंत कासवगतीने असल्याने संपूर्ण शहराची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणार विकास काय कामाचा असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सध्या शहरातील विविध प्रभागांत कोणत्याही पूर्वसूचनांशिवाय खोदकाम केले जात असून, अनेक ठिकाणी तर चार-सहा महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून तयार केलेले चकाचक सिमेंट रस्ते ड्रेनेजलाइनसाठी पुन्हा उकरले गेले आहेत. या अर्धवट कामांमुळे वाहनाधारकांसह पादचाऱ्यांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत असून, चकाचक रस्त्यांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या नशिबी आता केवळ खड्डेमय रस्ते आणि धुळीचे साम्राज्य आले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर होणारी भीषण वाहतूककोंडी पाहता, नागरिकांना घराबाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. विकासाला विरोध नसला तरी, लोकांचा जीव धोक्यात घालून आणि दैनंदिन जगणे कठीण करून केला जाणारा असा विकास नक्की कोणासाठी, असा सवाल आता विचारला जात आहे. प्रशासनाने विकासकामे करताना आधी योग्य नियोजन करावे आणि कामांमुळे जनतेला त्रास होणार नाही याची लेखी ग्वाही द्यावी, अशी मागणी जोर धरत असून "वेठीस धरणारा विकास आम्हाला नकोच" अशा शब्दांत नांदेडकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सहा महिन्यांतच नवीन रस्ता खोदलाशहरातील शिवाजीनगर ते गोकुळनगर स्टेडियमकडे जाणारा सीसी रस्ता जवळपास सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आला होता. रस्त्याचे काम देखील पूर्ण झाले होते. मात्र, मागील पंधरवड्यात सदर नव्या रस्त्यावरच जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून ड्रेनेजलाइनचे काम करण्यात आले. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून दुरुस्तीनंतरही रस्त्याची गुणवत्ता पूर्वीप्रमाणे राहणार नाही. त्यामुळे रस्ताकाम करण्यापूर्वी प्रशासनाला ड्रेनेजलाइन टाकण्याची आठवण आली नव्हती का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

या भागात रस्त्यावरून चालणे अवघडशहरातील विद्युतनगर चौक, शाहूनगर, बाबानगर, आनंदनगर, वसंतनगर, विष्णुनगर, गोकुळनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, तथागतनगर, वैशालीनगर, फारूखनगर, देगलूर नाका, केळी मार्केट, बाफना टी, हिंगोली नाका पॉइंट आदी भागांत रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून ड्रेनेजलाइन टाकण्यात आली आहे. खोदकामावर थोडीफार गिट्टी टाकून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. गिट्टीत वाहने फसत असल्याने अपघात होत असून या रस्त्यांनी पायी चालणे देखील कठीण बनले आहे.

घराबाहेर पडणे कठीणविकासाला आमचा विरोध नाही; पण तो नियोजित असावा. आधीच रस्ते खराब असताना आहे ते रस्तेही उकरून ठेवल्यामुळे आम्हाला घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. मनपाने यावर तातडीने उपाययोजना करावी.- साहेबराव लोहबंदे, नागरिक

निव्वळ पैशांचा अपव्ययगेल्या दोन वर्षांपासून नांदेडच्या रस्त्यांची जी अवस्था झाली आहे, ती पाहवत नाही. नवीन सिमेंट रस्ते उकरून पुन्हा तिथेच पाइपलाइन टाकणे, हा निव्वळ पैशांचा अपव्यय आणि जनतेचा छळ आहे. प्रशासनाने कामाचे नियोजन करावे.- देवानंद मुंदडा, नागरिक

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded residents suffer due to unplanned development, express outrage.

Web Summary : Nanded residents are frustrated with ongoing development projects under 'Amrut 2.0'. Roads are dug up without planning, causing traffic, dust, and inconvenience. Citizens question the purpose of such disruptive development and demand better planning to minimize public suffering and prevent waste.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका