शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नांदेड शहरात साडेआठ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:04 IST

नांदेड : प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पानमसाला वाहतूक करणारा महिंद्रा पीकअप टेम्पो इतवारा पोलीस व अन्न व औषध ...

ठळक मुद्देइतवारा हद्दीत कारवाईएका आरोपीला केली अटक

नांदेड : प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पानमसाला वाहतूक करणारा महिंद्रा पीकअप टेम्पो इतवारा पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी पकडला़ या टेम्पोमध्ये ३० पोती आढळून आली आहेत़ त्यामध्ये तंबाखू आणि पानमसाला होता़ यावेळी पथकाने जवळपास साडेआठ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे़जिल्ह्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूची सर्रासपणे विक्री केली जात आहे़ कोणत्याही पानटपरीवर अगदी सहजपणे गुटखा मिळतो़ शासनाची बंदी असली तरी, अंमलबजावणी मात्र होत नसल्याचेच आजपर्यंत दिसून आले़मंगळवारी देगलूर नाका परिसरात हैदर फंक्शन हॉलच्या समोर महिंद्रा पीकअप क्रमांक (एम.एच. ३७ बी. ३७३) संशयितरित्या उभा असलेला इतवारा पोलिसांना आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक रोयलावार यांनी अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेवून या टेम्पोची तपासणी केली असता त्यात गुटखासाठा असल्याचे आढळून आले. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देवून टेम्पो इतवारा ठाण्यात आणण्यात आला. पीकअप टेम्पोतील गुटख्याने भरलेली गोणी बाहेर काढण्यात आली. त्यात ६ बॅगमध्ये सुगंधित तंबाखू तर २४ बॅगमध्ये राजनिवास पानमसाला हा गुटखा आढळून आला. या मालाची किंमत साडेआठ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी शेख मुक्तार शेख युनूस रा. देगलूर नाका यास ताब्यात घेतले आहे. इतवाराचे पोनि़साहेबराव नरवाडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त टी. सी. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. रोयलावार, अन्नसुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस