शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चालू शैक्षणिक वर्षातच नांदेडला कृषी महाविद्यालय, ६० विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश

By प्रसाद आर्वीकर | Updated: October 14, 2023 14:04 IST

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती.

नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात येत असून, चालू शैक्षणिक वर्षातच या महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरीनंतर १२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने आदेश काढून या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मंजुरी दिली आहे. नांदेड येथे कृषी महाविद्यालय सुरू होणार असल्याने कृषी क्षेत्रात करिअर करण्याची संधी असणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. दरम्यान, या कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि इतर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासन आदेशात देण्यात आले आहेत.

३० हेक्टर जमिनीची आवश्यकतानांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या निकषानुसार ३० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेड जिल्ह्यात कृषी तंत्र विद्यालयांतर्गत ५२ हेक्टर, कापूस संशोधन केंद्रांतर्गत बाफना टी पॉईंट येथे ३६.३३ हेक्टर व धनेगाव फार्म येथे १७.४० हेक्टर अशी १०५.७३ हेक्टर जमीन कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. यातून कृषी महाविद्यालयासाठी ३० हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे.

८८ पदांना मिळाली मंजुरीया कृषी महाविद्यालयाला नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने ८८ पदांना मान्यता दिली आहे. त्यामध्ये ४१ पदे हे शिक्षकीय असतील तर ४३ पदे शिक्षकेतर राहणार आहेत. उच्चस्तरीय सचिव समितीची या पदांना मान्यता घेतली जाणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणAgriculture Sectorशेती क्षेत्र