शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात फसवणुकीच्या दोन घटनांत ९८ लाख ४१ हजारांना चुना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:14 IST

न्यायालयाच्या आदेशाने भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला

ठळक मुद्देआरोपींची जिवे मारण्याची धमकी दिली

नांदेड : नोकरी नांदेडमध्ये फसवणुकीच्या दोन घटनांमध्ये ९८ लाख ४१ हजारांना चुना लावण्याचे प्रकरण समोर आले. यात नोकरीला लावतो म्हणून झालेल्या फसवणुकीत न्यायालयाच्या आदेशाने भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला, तर दुसऱ्या घटनेत व्यापाऱ्याला फसविले.

शहरातील तरोडा खु. भागातील सिद्धीविनायकनगर येथील सुनंदा तुकाराम चिट्टे या महिलेस आरोपीने ८ मे २००९ ते १८ मे २०१८ या कालावधीत दोन्ही मुलांना आणि मेहुण्यास नोकरी लावतो म्हणून चिट्टे यांच्याकडून तब्बल ३२ लाख रुपये उकळले. ही रक्कम उकळूनही मुलांना व मेहुण्याला नोकरी लागली नाही. त्यामुळे चिट्टे यांनी आरोपितांना पैसे परत देण्याची मागणी केली. यावेळी पैसे परत मागायला आलात तर दोन्ही मुलांना आणि तुला खतम करतो असे म्हणून आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात चिट्टे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात भोकर येथील नवा मोंढा मार्केट येथील व्यापारी गोपाल राधेश्याम असावा यांच्याकडून गुजरातमधील गांधीधाम कच्छ येथील आरोपिंनी  २ आॅक्टोबर २०१७ ते १२ आॅक्टोबर २०१७ च्या दरम्यान तीळ पाठविण्यास सांगितले. सदर तिळाचे पैसे आरटीजीएसद्वारे दिले जातील, असे सांगण्यात आले. मात्र सदर तिळाचे पैसे २०१८ पर्यंत दिलेच नाही. आरोपिंनी पुन्हा एकदा गोपाल असावा यांना संपर्क साधून रोख दहा लाख रुपये घेऊन गेले. या प्रकरणात ५६ लाख ४१ हजार रुपयांचा माल आणि पुन्हा रोख दहा लाख घेऊन गेले. पैसे परत न आल्याने असावा यांनी ६६ लाख ४१ हजार ६४९ रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी भोकर ठाण्यात तक्रार दिली. यावरून गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शेतकऱ्यास  तीन लाखांना फसवलेआंबेसांगवी येथील शेतकरी गणेश संभाजी कोंडेकर यांच्याकडील ४१ क्विंटल सोयाबीन १२ एप्रिल २०१९ रोजी आंबेसांगवी येथीलच एका व्यापाऱ्याने खरेदी केले. सदर सोयाबीनचे ३ लाख ५ हजार १२० रुपये चेकद्वारे घेण्यास सांगितले. मात्र, सदर चेक शेतकऱ्याला दिलाच नाही. अखेर शेतकरी गणेश कोंडेकर यांनी सोनखेड ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिसfraudधोकेबाजी