शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ८०० कोरोना रुग्ण घेत आहेत घरीच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 19:22 IST

विलगीकरण कालावधीत आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत  रुग्णाबरोबरच नातेवाईकाकडून हमीपत्र घेतले जात आहेत.

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची परिस्थितीबिल कलेक्टरमार्फत रुग्णाच्या घराची पाहणीस्वतंत्र स्वच्छतागृहासह सुविधांची अट

- अनुराग पोवळे

नांदेड :जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खाजगी रुग्णालयातही बेड नसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. नांदेड शहरात ८०० कोरोना रुग्ण हे गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ९ हजार ९८६ वर पोहचली आहे. सद्य:स्थितीत ३ हजार २८३ रुग्णावर कोविड केअर सेंटर आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.  पंजाब भवन, एनआरआय, महसूल भवन येथेही रुग्णावर उपचार सुरू आहेत. कोरोना तपासणीनंतर लक्षणे नसलेले रुग्ण पंजाब भवन, एनआरआय येथे पोहचत आहे. तिथे  तपासणी करुन लक्षणे नसलेल्या रुग्णांना मागणीनुसार गृह विलगीकरणात ठेवण्याची मुभा देत आहे. या प्रक्रियेत लक्षणे नसणे ही बाब महत्वाची आहेच.  विलगीकरण कालावधीत आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत  रुग्णाबरोबरच नातेवाईकाकडून हमीपत्र घेतले जात आहेत. याबरोबरच  रुग्णाची घरी विलगीकरणात राहण्याची व्यवस्था आहे की नाही? याची खात्रीही केली जात आहे.  रुग्ण राहत असलेल्या भागातील बील कलेक्टर मार्फत रुग्णाच्या घराची पाहणी केली जात आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. एका कुटुंबासाठी एकच स्वच्छतागृह असेल तर रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याची परवानगी दिली जात नाही.  यासह महापालिकेच्या एका आरोग्य कर्मचाऱ्याची त्याच्यावर निगराणीसाठी नियुक्ती केली जात आहे. प्रकृतीबाबत सदर कर्मचारी रुग्णाची दररोज माहिती घेत आहे. काळजी घेणारेही महापालिका आरोग्य विभागाकडे याबाबत कळवत आहेत. या तपासणीत ताप, रक्तातील आॅक्सीजनचे प्रमाण, रक्तदाब त्यासह श्वास घेण्यास काही अडचण तर नाही ना, याची पाहणी केली जात आहे.

लक्षणे नसलेल्यांना गृह विलगीकरणाच्या सुचनाच्लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सूचना आयसीएमआर, राज्य शासनानेही दिली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता बेडची संख्या कमी पडू नये या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचवेळी उपचाराची गरज असलेल्या, लक्षणे असलेल्या रुग्णांना बेडची आवश्यकता आहे. शहरात अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या ११३० इतकी आहे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत आणि     ज्यांच्याकडे विलगीकरणाची व्यवस्था आहे त्यांना परवानगी दिली जात आहे. पण ही मुभा आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच दिली जात असल्याचे आयुक्त  डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड