शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाव, सातबारा शेतकऱ्याचा; पैसा जातोय केंद्र चालकांच्या खात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 09:03 IST

चार केंद्रांवर प्रकार उघडकीस, अस्मानीने मारले अन् सुलतानीने लुबाडले

लोकमत न्यूज नेटवर्क  नांदेड : राज्य शासनाने एक रुपयात पीक विम्याची घोषणा केली. परंतु अनेक सीएससी केंद्र चालकांनी परस्परच अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा भरून विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यात वळती करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चार केंद्र सध्या निष्पन्न झाली आहेत.  

मागील आठवड्यात दोन वेळेस  अतिवृष्टी झाली. अद्याप ती नुकसान भरपाई  मिळाली नाही. दुबार पेरणीचे संकट असताना आता पीक विमा भरणा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना गंडविण्याचा प्रकार समोर आला आहे. 

पीक विमा भरण्याची मुदत संपल्यानंतरही जवळपास ३० हजारांवर शेतकरी विमा भरुच शकले नाहीत. विशेष म्हणजे यातील हजारो शेतकऱ्यांच्या नावाने केंद्र चालकांनीच त्यांचा सातबारा आणि इतर कागदपत्रांचा वापर करुन एक रुपयाच्या शुल्काद्वारे विमा भरला. 

३० हजारांवर शेतकऱ्यांच्या तक्रारी    पीक विमा कंपनीकडे जवळपास ३० हजारांवर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याची माहिती आहे. यावरून जिल्ह्यातील अनेक सीएससी केंद्र चालकांनी अशाच प्रकारे बोगसपणा केल्याचे दिसून येते. सर्व तक्रारींची खोलात जाऊन चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

केंद्र चालक रातोरात शेकडो एकरचा मालककंधार शहरातील एका केंद्र चालकाला केवळ दीड एकर शेती आहे. या केंद्रावर जवळपास ६०० शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला. त्यातील १६० शेतकऱ्यांचा विमा या केंद्र चालकाने परस्पर काढला असून तशी कबुलीही त्याने दिली. संबंधित १६० शेतकरी पीक विम्याच्या रकमेला मुकणार आहेत. 

बँक खाते क्रमांक आपले किंवा नातेवाइकांचे टाकले. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा आला तरी, तो थेट केंद्र चालक किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या खात्यात जमा होणार आहे. या ऑनलाइन लुटीबाबत शेतकरी मात्र अनभिज्ञ आहेत. 

शेतकऱ्यांच्या नावे परस्पर पीक विमा भरणारी जिल्ह्यातील चार केंद्र निष्पन्न झाली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित विमा कंपनीला कळविण्यात आले आहे.- भाऊसाहेब बार्‍हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक 

टॅग्स :Farmerशेतकरी