शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मनपाची कर वसुली ५ कोटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:37 IST

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेने गतवर्षीपेक्षा ५ कोटीहून अधिक कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या कर वसुलीत पाणी कराचा समावेश नाही.

ठळक मुद्देवसुली : मनपा यंत्रणा निवडणूकीत गुंतल्याने कर वसुलीवर परिणाम

नांदेड : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेने गतवर्षीपेक्षा ५ कोटीहून अधिक कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या कर वसुलीत पाणी कराचा समावेश नाही. तो कर वेगळ्याने वसूल करण्यात आला आहे.महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय १ ते ६ अंतर्गत तब्बल १२३ कोटी ७१ लाख ८८ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यात २०१८-१९ या वर्षाची मागणी ६३ कोटी २६ लाख ८२ हजार इतकी होती. जवळपास १८६ कोटी ९८ लाख ७० हजारांचा वसुलीचा डोंगर महापालिकेला पार करावयाचा होता. त्यात महापालिकेने कर वसुली मोहिमे दरम्यान थकीत असलेल्या रकमेपैकी १९ कोटी १२ लाख १६ हजार रुपयांची वसुली पूर्ण केली तर चालू वर्षातील २७ कोटी १२ लाख ४८ हजार ७८८ रुपये करापोटी वसूल केले आहे. महापालिकेने जवळपास ४७ कोटी रुपयांची वसुली पूर्ण केली आहे.महापालिकेने केलेल्या कर वसुलीचे प्रमाण हे जवळपास ५० टक्क्यांवर पोहचले आहे. २०१७-१८ मध्ये हेच प्रमाण ४२ टक्क्यांवर होते.विशेष म्हणजे १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली. महापालिकेचे निम्याहून अधिक बील कलेक्टर हे निवडणुकीच्या कामामध्ये घेण्यात आले.त्याचा परिणाम वसुलीवर निश्चितपणे जाणवला. पण असे असतानाही महापालिका आयुक्त लहुराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त संधु यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी वसुली मोहीम सुरूच ठेवत गत वर्षीपेक्षा ५ कोटीने यंदा कर वसुली अधिकची केली आहे.या कर वसुलीचा निश्चितच महापालिकेच्या विकास कामांना लाभ मिळणार आहे. त्याचवेळी महापालिका कर वसुलीची आपली मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे उपायुक्त संधु म्हणाले. महापालिका यंत्रणा निवडणूक कामात गुंतली असल्याने अपेक्षित कर वसुली पूर्ण झाली नाही. परिणामी आगामी आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच वसुलीला प्रारंभ केला जाणार आहे. वर्षानुवर्षे कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांनी आपल्याकडील कराचा भरणा त्वरित करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.दरम्यान, महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कर वसुली हाच ं आहे. त्यामुळे कर वसुलीकडे आगामी काळात सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. जप्तीसह अन्य दंडात्मक कारवाई सुरुच ठेवली जाणार आहे.कर वसुलीत मालमत्ता विभागाचाही मोठा वाटामहापालिकेच्या या वार्षिक कर वसुलीत मालमत्ता विभागाचाही मोठा वाटा राहिला आहे. महापालिकेने पहिल्यांदाच जाहिरात करातून तब्बल ६९ लाख १ हजार ९५६ रुपये वसूल केले आहे तर तय बाजारीतून ८२ लाख ५१ हजार वाहन तळाच्या कर वसुलीतून ९ लाख ३७ हजार ५०० रुपये तर वार्षिक भाडे वसुलीच्या माध्यमातून १ कोटी १५ लाख १ हजार ८७५ रुपये वसूल करण्यात आले आहे. महापालिकेने भाडे धारकांसाठी अभय योजना राबविली होती. या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ६० लाखांची कर वसुली महापालिकेने या योजनेतून केली आहे. विसावा उद्यानाच्या अनामत रक्कमेतून १५ लाख आणि केळी मार्केट येथे ११ लाखांची अनामत प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून थकीत वसुलीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्या प्रयत्नांना यश आले.दोन महिन्यात १६ कोटी२०१७-१८ मध्ये महापालिकेने ४२ कोटी ६५ लाख ५ हजार रुपयांची कर वसुली केली होती. महापालिकेच्या मालमत्ता विभागाचा पदभार उपायुक्त अजितपाल संधु यांनी २ फेब्रुवारी २०१९ रोजी स्वीकारला. त्यावेळी महापालिकेची ३१ कोटींची वसुली पूर्ण झाली होती. त्यानंतर जवळपास दोन महिन्यात उपायुक्त संधु यांनी ही वसुली १६ कोटीने वाढवत मार्च अखेर ४७ कोटींवर वसुलीचे प्रमाण पोहचविले.

टॅग्स :nanded-pcनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाTaxकर