शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मुदखेडमध्ये सोयाबीनचे भाव पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : तालुक्यात व्यापाऱ्यांकडून सोयाबीन पिकाची खरेदी कवडीमोल भावात (भाव पाडून) होत असून शासनाची हमीभावाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचा अनुभव प्रत्यक्षात शेतक-यांना येत आहे.बाजारपेठेत व्यापा-यांची मनमानी वाढली असून संबधित यंत्रणेचे याकडे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने सोयाबीनसाठी जाहीर केलेल्या हमीभाव संदर्भात अंमलबजावणीवर लक्ष देण्याची यंत्रणाच दिसेनाशी झाल्याने ...

ठळक मुद्देशेतकरी संत्पत : शासनाचा हमीभाव कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : तालुक्यात व्यापाऱ्यांकडून सोयाबीन पिकाची खरेदी कवडीमोल भावात (भाव पाडून) होत असून शासनाची हमीभावाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचा अनुभव प्रत्यक्षात शेतक-यांना येत आहे.बाजारपेठेत व्यापा-यांची मनमानी वाढली असून संबधित यंत्रणेचे याकडे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने सोयाबीनसाठी जाहीर केलेल्या हमीभाव संदर्भात अंमलबजावणीवर लक्ष देण्याची यंत्रणाच दिसेनाशी झाल्याने शेतक-यांना गरजे पोटी मिळेल तेच भाव स्वीकारावे लागत आहेत़ भाव पाडून सोयबिन पिकाची खरेदी रोखण्यासाठी संबधित यंत्रणा सक्षम नसल्याने व्यापा-यांचे उखळ पांढरे होत आहे़शेतक-यांला गरजेपोटी कमी भावात विक्री करावी लागत आहे. राज्य सरकारने सोयबीन, मूग, उडीद, तूर, भात यांसह एकूण १२ पिकांना हमीभाव जाहीर केलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीमालाला व्यापा-यांकडून योग्य हमीभाव मिळावा यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. जे व्यापारी शेतक-यांच्या मालाला हमीभाव देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे कागदोपत्री आदेश दिले आहेत. राज्य सरकारने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ३४०० रुपये जाहीर केलेला आहे. जून-जुलै च्या महिन्यात सोयाबीन पेरणी झालेले आता काढणीला आलेले आहे.मुदखेडसह परिसरातील खांबाला, डोणगाव, मेंढका, शेंबोली, पांढरवाडी, नागेली, बारड, बोरगाव, ईजळी, पाथरड, जवळा, चिकाळा येथे पेरणी केलेले सोयाबिन सध्या कापणीला आले आहे. सोयाबीन खरेदीसाठी व्यापारी व दलालांच्या फेºया वाढल्या आहेत.शेतीमालाला सरकारने जाहीर केलेल्या हमीभावानुसार दर मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. सोयाबीनला हमीभाव देण्यासाठी राज्य सरकारने नियम आखून दिले आहेत. व्यापा-यांकडे मॉईश्चर मशिन नसतानाही ते भाव पाडून मागत आहेत. शासनाने प्रत्येक केंद्र सुरू सर्व शेतकºयांचे सोयाबीन खरेदी करणे गरजेचे आहे़हमीभाव ३४०० ; हाती २९०० रूपयेतालुक्यातील मुख्य म्हणजे मुदखेड आणि बारड, रोहीपिंपळगाव,येथील बाजारात व्यापा-यांनी सोयबीन खरेदीसाठी दुकाने थाटली आहेत. मॉईश्चर, काडी कचरा, काळे डाग अशी कारणे दाखवून व्यापारी शेतक-यांना लुबाडत आहेत.गरिब शेतकरी गरजेपोटी विना पावती सोयाबिन विकत आहेत. सध्या तालुक्यातील मुदखेड, बारड, मुगट, रोहीपिंपळगाव, माळकौठा, पार्डी, वैजापुर, निवघा या भागात सोयाबीनची काढणी सुरू आहे. त्यामुळे व्यापारी आणि दलाल गावागावांत जाऊन सोयाबीनची खरेदी करत आहेत. सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल ३४०० रुपये असताना शेतकºयांच्या हातावर २९०० ते ३००० रुपये टेकवले जात आहेत.

टॅग्स :NandedनांदेडMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी