शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुदखेड बसस्थानकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:21 IST

येथील एसटी बसस्थानक मद्यपी, आंबटशौकीनांसाठी अड्डा बनले असून लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीचा उपयोग प्रवाशांसाठी होत नसल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही वास्तू डोकेदुखी ठरली आहे़ या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून वास्तू धूळ खातबसस्थानक बनले मद्यपी, आंबटशौकिनांचा अड्डा

मुदखेड : येथील एसटी बसस्थानक मद्यपी, आंबटशौकीनांसाठी अड्डा बनले असून लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीचा उपयोग प्रवाशांसाठी होत नसल्याने स्थानिक नागरिकांसाठी ही वास्तू डोकेदुखी ठरली आहे़ या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.मुदखेड बसस्थानकाचे बांंधकाम पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटून गेली, तरीही बसस्थानक आवारात एकही बस येत नाही. मुदखेड तालुका असूनही बसस्थानक प्रमुख नाही. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही वास्तु अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहे. त्यामुळे हा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.मुदखेडला तालुक्याचा दर्जा मिळाल्यापासून या भागातील नेत्यांनी शहरविकासासाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकले. तालुक्यासाठी उपयुक्त अशी तहसील आणि पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभारली. यासोबत शासकीय विश्रामगृह, तंत्र निकेतन, ग्रामीण रूग्णालय, विद्यालये, महाविद्यालये, नगरपालिका इमारत यासारख्या भव्यदिव्य इमारती उभारल्या. फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला आंतरराष्ट्रीयस्तरावर मार्केट मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत़ परंतु, बसस्थानकाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लोकप्रतिनिधीला अनेकवेळा विरोधकाच्या टिकेला सामोरे जावे लागले. प्रवाशांच्या सोईसाठी बसस्थानकाची व्यवस्था केली खरी, परंतु ते ठिकाण शहरापासून दूर व एकांतात असल्यामुळे पंधरा वर्षांपासून उभ्या असलेल्या बसस्थानकात प्रवासी फिरकत नाहीत़ उन्हाळ्यात, पावसाळ्यात बाहेरुन ये - जा करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ पाहता शहर प्रशासनाने शहरात तीन-चार प्रवासी निवारे उभारुन काही प्रमाणात का होईना प्रवाशांची गैरसोय दूर केली. त्यामुळे बसस्थानक आजही ओसाडच पडले आहे. त्यात वाढलेली मोठमोठी बाभळीची झाडे ही उघड्यावर शौचालय करणाऱ्यांना आडोसा करण्याचे काम ही लाखोंची वास्तु करत असून दारुड्यासाठी तर हे ठिकाण विरंगुळा बैठक, आंबट -शौकीनांचा अड्डा बनला असल्याचे या परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या देशी विदेशी दारूच्या, पाण्याच्या बाटल्या व इतर साहित्यावरुन दिसून येते. नांदेड, उमरीकडे जाणा-या अनेक एसटी बसेस स्थानकाकडे न वळता रस्त्यावरच परस्पर उभ्या राहत असतात. त्यामुळे प्रवाशांना भरउन्हात रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठांना या बाबीकडे लक्ष घालून प्रवासाची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे़मुदखेड बसस्थानकाचे बांंधकाम पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटून गेली, तरीही बसस्थानक आवारात एकही बस येत नाही. मुदखेड तालुका असूनही बसस्थानक प्रमुख नाही.नांदेड, उमरीकडे जाणा-या एसटी बसस्थानकाकडे न वळता रस्त्यावरच उभ्या राहतात़ त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते़प्रवासी निवा-यामुळे बसस्थानक ओसाडउन्हाळ्यात, पावसाळ्यात बाहेरुन ये -जा करणा-या प्रवाशांची तारांबळ पाहता शहर प्रशासनाने शहरात तीन- चार प्रवासी निवारे उभारले़ त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली़ मात्र, त्यामुळे बसस्थानक ओसाड पडले आहे. त्यात वाढलेली बाभळीची झाडे ही उघडयावर शौचालय करणा-यांसाठी आडोसा ठरले आहेत़ लाखों रूपये खर्च करून उभारलेली ही वास्तु मद्यपी व आंबटशौकीनांचा अड्डा बनला असल्याचे या परिसरात अस्ताव्यस्त पडलेल्या दारूच्या, पाण्याच्या बाटल्या व इतर साहित्यावरुन दिसून येते.बसफे-या वाढल्यानंतर बसस्थानक सुरू करणारमुदखेड येथे एस.टी.बसच्या फे-या कमी झाल्यामुळे बसस्थानक बंद आहे. म.रा.प.म.विभागाला मुदखेड येथील बसस्थानकासाठी वाहतूक नियंत्रक देण्यास परवडणारे नाही. यामुळे वरिष्ठ पातळीवरून सदरील बसस्थानक बंद करण्याचे आदेश आहेत. म्हणून, बसस्थानकाची इमारत बंद अवस्थेत आहे.मुदखेड परिसरात एस.टी. बसच्या फेºया वाढल्यानंतर आम्ही वरिष्ठांकडे वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करुन बसस्थानक सुरु करण्यासंदर्भात अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठवू. सध्या मुदखेड येथे दिवसभरात फक्त १५ ते २० बसफे-या होत आहेत -पुरुषोत्तम व्यवहारे, डी.एम.म.रा.प.विभाग नांदेड

टॅग्स :Nandedनांदेडstate transportएसटी