शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बनावट बँक गॅरंटी देवून सेवाभावी संस्थेकडून महावितरणची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:47 IST

गडगा येथील आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देवीजबिलाच्या रक्कमे ऐवढी अतिरिक्त अनामत रक्कम किंवा बँक गँरंटी देणे आवश्यक बिलाच्या रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला

नांदेड : नांदेड शहर विभाग कार्यालयाच्या अंतर्गत गडगा येथील अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला शहरात तीन ‍ठिकाणी वीजबील भरणा केंद्र चालवण्यास देण्यात आले होते. मात्र या संस्थेच्या संचालकांनी महावितरणची फसवणुक करत दहा लक्ष रूपयांची खोटी बँक गॅरंटी तयार करुन ती खरी असल्याचे भासवल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष संजय किशन भांगे व सचीव राजकुमार किशनराव भांगे या दोघांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहर उपविभागांतर्गत विद्युत भवन साठे चौक, वजिराबाद व देगलूर नाका येथे वीजबिल भरणा केंद्र डिसेंबर २०१७ मध्ये आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेस चालविण्यास देण्यात आलेले होते.  महावितरण सोबत झालेल्या कराराच्या अनुशंगाने सरासरी तीन दिवसाच्या जमा झालेल्या वीजबिलाच्या रक्कमे ऐवढी अतिरिक्त अनामत रक्कम किंवा बँक गँरंटी देणे आवश्यक होते.  या संबंधी सदरील संस्थेस कळविण्यात आले होते.  सदरील संस्थेने माहे जानेवारी-2019 रोजी महाराष्ट्र ग्रामिण बँक, शाखा गडगा यांचेकडील रुपये दहा लाख एवढया रक्कमेची बँक गॅरंटी महावितरणकडे जमा केली.  सदरील संस्थेने मुखेड येथील वीजबिल भरणा केंद्रात वीजग्राहकांनी जमा केलेल्या बिलाच्या रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.  या अनुशंगाने सदरील संस्थेने देण्यात आलेली बँक गॅरंटी नियमाप्रमाणे वटविण्या करिता संबंधीत महाराष्ट्र ग्रामिण बँक, शाखा गडगा येथे बँक गॅरंटी वटविण्यासाठी सुचित केले असता बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी सदरील बँक गॅरंटी खोटी व बनावट असल्याचे सांगून आम्ही बँक गॅरंटी दिलीच नाही असे महावितरणला कळविले. 

आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्‍यक्ष संजय किशन भांगे व सचीव राजकुमार किशनराव भांगे या दोघांनी महावितरणला खोटी व बनावट बँक गॅरंटी देऊन महावितरणची जाणुन बूजून हेतूपुरस्सर फसवणुक केल्या प्रकरणी भा.द.वि. कलम 420, 467, 468, 471 व 34 अन्वये नायगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडmahavitaranमहावितरणfraudधोकेबाजी