शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

खासदार नांदेडमध्येच बोलतात दिल्लीत बोलता येत नाही; आमदार अमर राजूरकरांची बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 15:59 IST

मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर गप्प का ?

ठळक मुद्देहिंदीच बोलता येईना इंग्लिश काय बोलणार

अर्धापूर ( नांदेड ) :  भाजपचे खासदार नांदेडमध्येच बोलतात दिल्लीत बोलतच नाहीत...हिंदीच बोलता येत नाही तर इंग्लिश काय बोलणार, अशी बोचरी टीका अर्धापूर येथील कार्यक्रमात बुधवारी ( दि. १) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ. अमर राजूरकर ( Amar Rajurakar ) यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर ( Pratap Patil Chikhalikar ) यांच्यावर केली. ( MLA Amar Rajurkar's harsh criticism om MP Pratap Patil Chikhalikar) 

नांदेड जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात. आता जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती निवडणुकाजवळ आल्या असून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. बुधवारी आ. अमर राजूरकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे शहर कॉंग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आ. राजूरकर यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार चिखलीकर गप्प का ? असा प्रश्न राजूरकर यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणासाठी अशोकराव  परिश्रम घेत आहेत. शहराच्या विकासासाठी चव्हाण साहेबांनी मोठा निधी दिला आहे. त्या अनुषंगाने अनेक कामे प्रगती पथावर आहेत. आगामी काळात नगर पंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी निवडणुका असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करावी असे आवाहन राजूरकर यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नासेरखान पठाण, नगराध्यक्ष प्र.शेख लायक, उपनगराध्यक्ष डॉ.विशाल लंगडे, गाजी काजी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरूपती पा. कोंढेकर, भगवान तिडके, मदन देशमुख, विजयराव देवडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Pratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकरAmara Rajurakarअमर राजूरकरNandedनांदेडcongressकाँग्रेस