शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नांदेडात शीख समाजाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:50 IST

येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयास नांदेडमध्ये शीख समाजाकडून विरोध करण्यात आला आहे़ या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी काळा दिवस पाळण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़

ठळक मुद्देगुरुद्वारा बोर्ड : नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ केल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयास नांदेडमध्ये शीख समाजाकडून विरोध करण्यात आला आहे़ या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी काळा दिवस पाळण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायद्यात सुधारणा करत दोनऐवजी शासन नियुक्त सदस्य आठ राहतील असा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार नांदेड गुरुद्वारा बोर्डावर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथील शीख प्रतिनिधींची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे़ गुरुद्वारा बोर्ड अ‍ॅक्ट कायद्यातही ही सुधारणा अनावश्यक आणि स्थानिक शीख समाजाला विश्वासात न घेता केल्याचा आरोप गुरुवारी आंदोलनकर्त्यांनी केला़ यापूर्वी राज्य शासनाने १२ मार्च २०१५ रोजी गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यात संशोधन करून बोर्डाच्या अध्यक्षाची नियुक्ती शासन करेल असा निर्णय घेतला होता़ या निर्णयासही विरोध झाला होता़ आता आणखी सहा सदस्य नियुक्त करून शासन स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे़ गुरुद्वारा बोर्ड कायद्यानुसार दर तीन वर्षाला निवडणुका व्हाव्यात असे अपेक्षित आहे़ त्यामुळे विद्यमान गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करून तीन जागांच्या निवडणुका जाहीर कराव्यात, गुरुद्वारा बोर्ड कायद्यातील कलम ११ नुसार अध्यक्षांची नियुक्ती शासन करेल हा आदेश रद्द करून गुरुद्वारा बोर्डाच्या १७ सदस्यांना अध्यक्ष निवडीचा अधिकार देण्यात यावा आणि गुरुद्वारा बोर्ड कायद्यात बदल किंवा संशोधन करण्यापूर्वी नांदेडच्या शीख समाजाची संमती मिळवावी त्यानंतरच कायद्यात तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली़ आंदोलनात स़देविंदरसिंघ मोटरवाले, स़इंद्रसिंघ गल्लीवाले, स़देविंदरसिंघ विष्णुपूरीकर, स़अवतारसिंघ पहेरेदार, अ‍ॅड़स़मदनमोहनसिंघ खालसा, स़रविंद्रसिंघ मोदी, स़जसपालसिंघ लांगरी, स़तेजपालसिंघ खेड, स़विरेंद्रसिंघ बेदी, सग़ुरुमीतसिंघ बेदी, स़जर्नेलसिंघ गाडीवाले, स़मोहनसिंघ गाडीवाले, स़जसप्रितसिंघ रोहीत, स़नरेंद्रसिंघ लिखारी आदींची उपस्थिती होती़---श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायद्यात सुधारणा करून दोनऐवजी आठ सदस्य राहतील असा निर्णय घेतला़ त्यानुसार नांदेड गुरुद्वारा बोर्डावर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील सदस्य नियुक्तीस मान्यता दिली आहे़

 

टॅग्स :NandedनांदेडGurudwara Railway station Roadगुरुद्वारा रेल्वे स्टेशन रोडagitationआंदोलन