शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाणीटंचाई गावांच्या कृती आराखड्यासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:58 IST

यावर्षी तालुक्यात विशिष्ट पद्धतीने पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु पावसाचा लहरीपणा आडवा आला. पावसाळ्यात जलसाठे वाढले नाहीत. आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक व जलसाठे वाढीला मदत मिळाली नाही.

कंधार : आगामी काळात पाणी टंचाईची समस्या ग्रामीण भागात डोकेदुखी ठरणार असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई गावात उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी हालचालीना वेग आला आहे.यावर्षी तालुक्यात विशिष्ट पद्धतीने पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु पावसाचा लहरीपणा आडवा आला. पावसाळ्यात जलसाठे वाढले नाहीत. आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक व जलसाठे वाढीला मदत मिळाली नाही. त्यामुळे पाणीटंचाई प्रश्न जटील होणार. अशीच एकंदर स्थिती आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणी समस्या निवारण्यासाठी उपाययोजना करणारा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी बैठकीचे आयोजन केले जात आहे.सप्टेंबर महिन्यात तीन टप्प्यात आराखडा तयार करण्याची सूचना गटविकास अधिकारी यांना होती. त्यात आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असा समावेश होता. आता डिसेंबर महिन्यात बैठक असल्याने दोन टप्पे होतील.कृती आराखडा तयार करताना तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तावित करताना गावात मुळ नळयोजना असायला हवी.नळयोजना विशेष दुरूस्ती प्रस्तावित करताना मागील तीन वर्षात टंचाई अंतर्गत दुरूस्ती घेतलेली नाही. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. नवीन विंधन विहीर घेताना त्या गावातील विंधन विहीर संख्या विचारात घ्यावी. जिथे विंधन विहीर खोदल्यास दुषित पाणी लागते तेथे प्रस्ताव करू नये. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत मंजूर व प्रगतीपथावर योजना असलेल्या गावात नवीन विंधन विहीर, नळयोजना विशेष दुरूस्ती व पुरक नळयोजना अशा उपाययोजना प्रस्तावित न करता योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. एका गावासाठी एकच उपाययोजना प्रस्तावित करावी अशा सूचना व अटी असतात. याचे पालन करून आराखडा तयार केला जातो का? हे पहाणे तात्काळ मंजुरीसाठी महत्त्वाचे आहे. पाणीटंचाई आराखडा बैठकीवरून मागील कांही वर्षात राजकीय शहकाटशह होतात. मानपानाचे राजकारण रंगते. यावर्षी तरी तसे होणार नाही अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. दरम्यान, तालुक्यात आतापासूनच पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे़२१ नोव्हेंबर रोजी पूर्वतयारी बैठकीचे आयोजन

  • २१ नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी पूर्वतयारी बैठक घेणार असल्याचे समजते. त्यानंतर १ डिसेंबर रोजी आमदार प्रताप पा.चिखलीकर, सभापती सत्यभामाबाई देवकांबळे, उपसभापती भीमराव जायेभाये, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, अधिकारी, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी आदीच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यात पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा दोन टप्प्यात केला जाणार आहे.
  • पाणीटंचाई समस्या दूर करण्यासाठी जिल्हास्तरावरून कांही निर्देश असून त्यानुसार आराखडा केला जातो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.दरम्यान, पाणी टंचाईचा प्रश्न आतापासूनच जटील बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे़
  • प्रस्ताव तयार करताना गावात मुळ नळ योजना आवश्यक
  • कृती आराखडा तयार करताना तात्पुरती पूरक नळयोजना प्रस्तावित करताना गावात मुळ नळयोजना असायला हवी. नळयोजना विशेष दुरूस्ती प्रस्तावित करताना मागील तीन वर्षात टंचाई अंतर्गत दुरूस्ती घेतलेली नाही.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded zpनांदेड जिल्हा परिषद